Jump to content

गॅलप (न्यू मेक्सिको)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गॅलप (नवाहो:Naʼnízhoozhí:नानिझूझ्ही) हे अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील शहर आहे. हे शहर मॅककिनली काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २१,६७८ होती.

येथील लोकवस्तीत मूळ अमेरिकन रहिवाशांचे प्रमाण मोठे आहे. त्यात नवाहो, होपी आणि झुना जमातीच्या लोकांचा समावेश होतो.

गॅलप इंटरस्टेट ४०वर आहे.