गॅब्रियेल गार्सिया मार्केझ
Jump to navigation
Jump to search
गॅब्रियेल गार्सिया मार्केझ (स्पॅनिश: Gabriel García Márquez; ६ मार्च १९२७, अराकाताका, कोलंबिया - १७ एप्रिल २०१४, मेक्सिको सिटी, मेक्सिको) हे नोबेल पारितोषिक विजेते कोलंबियन लेखक व साहित्यिक होते. २० व्या शतकातील एक महत्त्वाचे लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. लॅटिन अमेरिकेत गॅबो या नावाने लोकप्रिय असणारे मार्केझ यांना इ.स. १९८२ मध्ये साहित्यासाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.