गृहप्रवेश
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
लग्नातील सर्व विधी करून झाल्यावर नवरदेव नवरी घरी येतात तेव्हा नवरीचा नवीन घरात गृहप्रवेश केला जातो. गृहप्रवेश करतांना प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर तांदूळ भरून एक माप ठेवलेले असते. नववधूने ते आपल्या उजव्या पायाने ओलांडून मग आत जावे अशी प्रथा आहे. त्याबरोबरच एका ताटात कुंकवाच पाणी केलं जात त्यात वधूने तिचे दोघे पाय टाकायचे आणि मग त्या कुंकवाच्या पायाने आत यायचे असते अशी प्रथा आहे. यामागे अशी कल्पना आहे की, नववधू लक्ष्मीच्या रूपाने या घरात आली आहे. धान्याच्या रूपाने ती या घरात समृद्धी आणेल. गृहप्रवेश करण्याच्या पाहिले वधू वाराला नाव घेण्यासाठी अडवतात नाव घेतल्याशिवाय आत येऊ देणार नाही अशी मज्जा मस्ती चालते वधू वर नाव घेतात. त्यांनतर ते गृहप्रवेश करतात.[१]
नववधूच्या गृहप्रवेश ची पद्धत
[संपादन]गृहप्रवेश करतांना प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर तांदूळ भरून एक माप ठेवलेले असते. नववधूने ते आपल्या उजव्या पायाने ओलांडून मग आत जावे अशी प्रथा आहे. त्याबरोबरच एका ताटात कुंकवाच पाणी केलं जात त्यात वधूने तिचे दोघे पाय टाकायचे आणि मग त्या कुंकवाच्या पायाने आत यायचे असते अशी प्रथा आहे. यामागे अशी कल्पना आहे की, नववधू लक्ष्मीच्या रूपाने या घरात आली आहे. धान्याच्या रूपाने ती या घरात समृद्धी आणेल.
गृहप्रवेश नंतर च्या काही चालीरीती
[संपादन]गृहप्रवेश झाल्यानंतर नववधू-वरांना देवघरात नेऊन देवाच्या पाया पडविले जातात. घरातील वडील मंडळींच्या पाया पडविले जातात. वधूस घरातील कोणाला अगदी लहान मुलांसह- काय हाक मारायची वगैरे सांगितले जाते. नववधू-वरांकडून लक्ष्मीपूजन करविले जाते. यावेळी नववधूचे नाव बदलून दुसरे ठेवायचे असल्यास ह्याच वेळी ठेवले जाते. ताम्हनात तांदुळाची रास घेऊन सोन्याच्या अंगठीने वर ते नाव लिहितो. उपस्थित मंडळींस साखर वाटून नवीन नाव सांगितले जाते.या वेळी ब्राह्मण हजर असल्यास ते व इतर वडील मंडळी उत्तम आशीर्वाद देतात. ते म्हणजे ‘अखंड सौभाग्यवती भव’, ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव’ वगैरे वगैरे. नंतर वर पक्ष्याने वधू पक्ष्यांचे मानपान करून त्यांची पाठवणी करायची असते. या प्रकारे नववधूचे स्वागत करून तिला नवीन कुटुंबात सामील करून घेतले जाते. तिला नवीन नाव दिले जाते. तिला नवीन कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून दिली जाते. तिला नवीन कुटुंबातील परंपरा आणि चालीरीतींबद्दल माहिती दिली जाते. या सर्व गोष्टींचा समावेश करून नववधूचे स्वागत अधिक औपचारिक आणि आदराने केले जाते.
- ^ हे सर्व आपले पारंपरिक वडिलोपार्जित चालत आलेले विधी आहेत. वडीलधाऱ्या माणसांकडून याची काही माहिती घेतली आहे. तसेच हे सर्व विधी लग्नकार्यात घडतात तर हे विधी कसे पार पडतात त्यांची पद्धत काय याची माहिती तिथून घेतली.