गुलबक्षी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुलबक्षी किंवा गुलबाक्षी (शास्त्रीय नाव: Mirabilis jalapa, उच्चार: मिराब्लिस हालापा) ही दक्षिण अमेरिका, आशिया खंडांतील उष्ण कटिबंधीय प्रदेशांत उगवणारी एक औषधी वनस्पती आहे. गुलबक्षी मुळातील दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतरांगांच्या प्रदेशांतून इ.स. १५४० नंतर बाहेरील जगात पसरलेली वनस्पती आहे. या वनस्पतीस गुलाबी रंगाची फुले येतात म्हणून तिला मराठीत हे नाव पडले [ संदर्भ हवा ]. यांत, इतरही अनेक रंगांची फुले येणाऱ्या जाती आहेत. दुपारी ४ वाजता फुलणारी म्हणुन 4o'clock. हे एक छोटे झाड असते. निर्लोमकरणासाठी, म्हणजेच केस काढण्यासाठी, याचे कंद वापरतात.

गुलबक्षीच्या फुलांना फारसा वास नसतो. पण त्यांचे लांब दांडे एकमेकांत गुंफून, सुईदोरा न वापरता या फुलांचे गजरे करता येतात. हे झुडुप वर्षातील बाराही महिने फुले देते.