गुजरात विधानसभा निवडणूक, २०१२ ही गुजरात राज्यामधील विधानसभा निवडणुक होती. ह्या निवडणुकीत गुजरात विधानसभेच्या सर्व १८२ जागांसाठी नवीन आमदार निवडले गेले. २००१ पासून मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षने पुन्हा एकदा शानदार प्रदर्शन देऊन ११६ जागांवर विजय मिळवत बहुमत राखले. पुढे २०१४ लोकसभा निवडणूकांमध्ये भाजपतर्फे पंतप्रधानपदाचे दावेदार असलेले मोदी लोकसभेमध्ये विजय मिळवून भारताचे पंतप्रधान बनले व त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्रीपद सोडले.