गीता माळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गीता माळी
जन्म नाव गीता विजय माळी
जन्म १९८२
नाशिक,महाराष्ट्र, भारत
मृत्यू १४ नोव्हेंबर २०१९
शहापूर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र गायन
भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी
पती अ‍ॅड. विजय माळी
अपत्ये मोहित

गीता माळी ह्या प्रसिद्ध मराठी गायिका होत्या. गीता मुळच्या नाशिक मधील इगतपुरी या गावच्या होत्या. गीता यांचे शालेय शिक्षण मराठा हायस्कूल मध्ये झाले. एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयाचे अविराज तायडे, पंडित शंकर वैरागकर, मुंबई विद्यापीठाचे अच्युत ठाकूर यांच्याकडे त्यांनी गायनाचे शिक्षण घेतले.

व्यक्तिगत जीवन[संपादन]

अध्यात्म आणि ध्यान धारणेचीही त्यांना आवड होती. सुगम संगीतामध्ये त्यांनी स्वतःची शैली निर्माण केली. गीता यांच्या पश्चात नवरा अ‍ॅड. विजय माळी, मुलगा मोहित, आई, वडील, दोन भाऊ, सासु-सासरे, असा परिवार आहे.[१]

परदेशी गायन[संपादन]

२०१७ साली ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये झालेल्या वीर सावरकर विश्व साहित्य संमेलनामध्ये त्यांनी गायन केले होते. गीता अमेरिकेत देखील विविध कार्यक्रमांसाठी गेल्या होत्या.

निधन[संपादन]

अमेरिका दौरा आटोपल्यानंतर दिनांक १४ नोव्हेंबर २०१९ (गुरूवारी) त्या भारतात परतल्या होत्या. मुंबई विमानतळावरून नाशिककडे परत येत असतांना शहापूरजवळ त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या इंधनाने भरलेल्या गाडीवर आदळली. या अपघातात गीता यांचा वयाच्या ३७साव्या वर्षी अपघाती मृत्यू झाला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "गायिका गीता माळी यांचे अपघाती निधन; 'ही' ठरली शेवटची फेसबुक पोस्ट". Loksatta. 2019-11-15 रोजी पाहिले.