गिरीश भालचंद्र पंचवाडकर
गिरीश भालचंद्र पंचवाडकर | |
---|---|
आयुष्य | |
जन्म | १ जुलै इ.स. १९६० |
जन्म स्थान | भारत |
व्यक्तिगत माहिती | |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी |
संगीत साधना | |
गुरू | भालचंद्र हरिभाऊ पंचवाडकर |
गायन प्रकार | गायन |
संगीत कारकीर्द | |
पेशा | संगीत दिग्दर्शक आणि गायक |
कारकिर्दीचा काळ | इ.स. १९९४ पासून पुढे |
गिरीश भालचंद्र पंचवाडकर (१ जुलै इ.स. १९६० - हयात) हे एक लोकप्रिय हिंदुस्तानी गायक आणि मराठी सुगम संगीत गायक आहेत.
पूर्वायुष्य
[संपादन]लहानपणापासून गिरीश यांना गाण्याची आवड होती. त्यांचे गायनाचे सुरुवातीचे शिक्षण त्यांचे वडील आणि गुरू भालचंद्र हरिभाऊ पंचवाडकर यांच्याकडे झाले.
सांगीतिक कारकीर्द
[संपादन]इ.स. १९९४ पासून गायनाचे कार्यक्रम करीत आले आहेत. "पहाटगाणी", "अक्षयगाणी" आणि "शब्दस्वरांचे इंद्रधनुष्य" हे त्यांचे कार्यक्रम विशेष गाजले. सोलापूर मध्ये "दिवाळी पहाट"ची सुरुवात त्यांनी केली. आकाशवाणी सोलापूर येथे त्यांचे गायनाचे अनेक कार्यक्रम झाले. क्षितिज या संस्थेतर्फे सुगम संगीताचे कार्यक्रम करतात. इ.स. २००९ मध्ये राष्ट्रपति भवन, दिल्ली येथे मराठी गायन मैफल करायची संधी त्यांना मिळाली.
पुरस्कार व सन्मान
[संपादन]- महाराष्ट्र शासन - गुणवान कामगार पुरस्कार
- महाराष्ट्र गुणीजन रत्न कलागौरव
- महापौर गौरव - उत्कृष्ट कलाकार
अतिशय सुंदर अक्षर आणि तितकेच सुंदर गायन यांसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांना अक्षय आणि अदिती पंचवाडकर अशी दोन मुले आहेत.
संदर्भ
[संपादन]- आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो... Archived 2012-07-01 at the Wayback Machine.
वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जुलै १, २०१२ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- राष्ट्रपतिभवनात सोलापूरच्या कलावंतांची अक्षयगाण्यांची रंगली स्वरमैफल![permanent dead link]
- 'सकाळ'च्या वर्धापनदिनानिमित्त 'अक्षयगाणी' Archived 2012-11-28 at Archive.is
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |