गिरिराज (कोंबडी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गिरिराज ही कुक्कुटपालन व्यवसायात वाढविल्या जाणाऱ्या कोंबड्यांची जात आहे.

वैशिष्ट्ये[संपादन]

  • गावठी कोंबड्यांप्रमाणे विविध रंगांत आढळतात.
  • कोणत्याही वातावरणात एकरूप होतात.
  • रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते.
  • मांस व अंडी भरपूर प्रमाणात मिळतात. (आठ आठवड्यांत सुमारे एक किलो)

- अंडी वर्षाकाठी 180 ते 200 मिळतात.

-मांस चविष्ट असते.

-74 टक्के मांस मिळते.

-या कोंबडीचा वयात येण्याचा कालावधी 166 दिवस

-अंड्यांतून सशक्त पिल्ले जन्माला येतात.

-सफल अंड्यांचे प्रमाण 87 टक्के. या कोंबडीला एक किलो वजनासाठी 2.6 किलो खाद्य द्यावे लागते.

गिरिराज कोंबडीचे व्यवस्थापन[संपादन]

खाद्य व्यवस्थापनासह सुरवातीपासून ते बाजारपेठेच्या टप्प्यापर्यंत कोंबडीची व्यवस्था चांगली घेतली तर या पक्ष्यांपासून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळू शकतो. गिरिराजची एक दिवसांची पिल्ले वाहतूक करून आपल्याकडे आणल्यानंतर प्रवासामुळे पिल्लांना एक प्रकारचा ताण येतो. तो कमी करण्यासाठी त्यांना इलेक्‍ट्रॉल पावडरचे द्रावण एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यात द्यावे. दुसऱ्या ते चौथ्या दिवसापर्यंत पाण्यातून प्रतिजैविक (ऍन्टिबायोटिक) द्यावे लागते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून रोगापासून संरक्षण मिळते. पाचव्या ते सहाव्या दिवशी त्यांना बी कॉम्प्लेक्‍स द्यावे. सातव्या दिवशी लासोटा लस द्यावी. लसीचा ताण येत असल्यामुळे दुसऱ्या दिवशी बी कॉम्प्लेक्‍स द्यावे. 14-15 व्या दिवशी गंभोरा लस द्यावी. त्याच्या दुसऱ्या दिवशी बी कॉम्प्लेक्‍स द्यावे. 25-30 दिवसांच्या दरम्यान व 40-50 दिवसांदरम्यान लिव्हर टॉनिक 20 मि.लि. प्रति 100 पक्ष्यांना द्यावे. गिरिराज कोंबडीचे लसीकरण व औषधी उपचार असे.