Jump to content

गिम्पो आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गिम्पो आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा किम्पो आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोरियन भाषा: 김포국제공항;किम्पोगुक्टेगोन्हान) (आहसंवि: GMPआप्रविको: RKSS) हा दक्षिण कोरियाच्या सोल शहरातील मोठा विमानतळ आहे. २०१० पूर्वी हा विमानतळ सोलमधील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ होता. इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधल्यावर येथील बरीचशी वाहतूक तेथून होते. आता हा विमानतळ दक्षिण कोरियातील प्रवासी वाहतूकीनुसार तिसऱ्या क्रमांकाचा विमानतळ आहे. येथून देशांतर्गत तसेच चीन, जपान आणि तैपैमधील काही शहरांना सेवा आहे.

हा विमानतळ सोल शहराच्या पश्चिमेस १५ किमी अंतरावर आहे. २०१४मध्ये या विमानतळावरून २,१५,६६,९४६ प्रवाशांनी ये-जा केली होती. प्रवासी व सामानवाहतूकीशिवाय येथे कोरियन आणि अमेरिकन वायुसेनांचे तळ आहेत.