गावडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


'गावडे' हे भारत देशात राहणाऱ्या मराठी समाजातले एक अाडनांव अहे. या आडनावाची कुटुंबे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेतच शिवाय या आडनावाचा अपभ्रंश होऊन महाराष्ट्राबाहेर इतर आडनावे देखील झाली आहेत. गावडे कुटुंबांचे महाराष्ट्रातील वास्तव्य केव्हापासून अाहे याचा शोध घेण्याची मोहीम जाणकार करत अाहेत, पण हाती असलेल्या काही कागदोपत्री मोडी लेखांतून असे समजले अाहे की, मालवण तालुक्यात चौके गावी अालेले गावडे कर्नाटकातून मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्थलांतरित झाले अाहेत. यावरुन गावडे दक्षिणेकडून महाराष्ट्रात आल्याचे समजते, पण मुळचे कोणते हे समजणे कठीण आहे.

गावडे आडनावाच्या लोकांचे गोत्र कश्यप व उपगोत्र धामपाळ असल्याची नोंद काही पुस्तकांत अाढळली अाहे. कलम (कळंब) हे कुळ असल्याचे सांगितले जाते. दोन कुटुंबांत लग्नसंबध जुळवतांना एकमेकांचे गोत्र विचारून सोयरीक केली जाते. सूर्यवंशात यांचा जन्म झाला म्हणजे गावडे मुळचे सूर्यवंशी आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात मराठ्यांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. या कालावधीत सदर गावडे हे महाराजांच्या चाकरीस असतांना शेतीची कामे व जमिनीची देखभाल करत, यामुळे योद्धे असूनही युद्धात सहभाग केवळ अावश्यकतेनुसार असे. शिवाजीच्ुा या चाकरीत असतांना यांना शेतकरी दर्जा मिळाला व ९६ कुळीत नोंद झाली.