गागाभट्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गागाभट्ट हे काशीत राहणारे एक विद्वान ब्राह्मण होते.[१] त्यांचे मूळ नाव विश्वेश्वर भट्ट होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक गागाभट्ट यांनी केला .[२]

राज्याभिषेक[संपादन]

शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी जेव्हा राज्याभिषेक करणे आवश्यक झाले तेव्हा महाराष्ट्रातील ब्राह्मण अनुकूल नव्हते. आधीच्या शेकडो वर्षांत महाराष्ट्रात कोणालाच राज्याभिषेक न झाल्याने राज्याभिषेकाच्या विधींचे कोणालाच ज्ञान नव्हते. या विषयावरील ग्रंथही उपलब्ध नव्हते. महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायला नकार दिला. मात्र पैठणमधील एका ब्राह्मणाने काशीतील गागाभट्टांचे नाव सुचवले.[३]

गागाभट्टांनी लिहिलेले ग्रंथ[संपादन]

 • कायास्थधर्म दीपिका [१]
 • निरूढ पशुबंधप्रयोग
 • भट्टचिंतामणी
 • मीमांसाकुसुमांजली
 • राकागम
 • राज्याभिषेकप्रयोग'
 • समयनय
 • सुज्ञानदुर्गोदय

संदर्भ[संपादन]

 • शिवाजी का राज्यभिषेक और उसके बाद (लेखक - सर जदुनाथ सरकार यांच्या ग्रंथातील एक प्रकरण)
 1. a b Rana, Bhawan Singh (2005). Chhatrapati Shivaji (en मजकूर). Diamond Pocket Books (P) Ltd. आय.एस.बी.एन. 9788128808265. 
 2. ^ Eraly, Abraham (2007-09-17). Emperors Of The Peacock Throne: The Saga of the Great Moghuls (en मजकूर). Penguin Books Limited. आय.एस.बी.एन. 9789351180937. 
 3. ^ Sarasvatī (hi मजकूर). Iṇḍiyana Presa. 1974-01.