गांधी फेलोशिप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गांधी फेल्लोशीप हा पिरामल स्कुल ऑफ लीडर आणि कैवल्य एज्युकेशन फौंडेशन या सामाजिक संस्थांनी सुरू केलेला दोन वर्षांचा निवासी शैक्षणिक नेतृत्व कार्यक्रम आहे.गांधी फेलोशिपची सुरुवात युवकांमध्ये सामाजिक बदलांबद्दल जागरूकता आणण्यासाठी आणि सामाजिक कार्यासाठी नेतृत्व क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे.तरुणांना समाजातील सकारात्मक बदलाच्या प्रक्रियेचा एक भाग बनवणे हा त्याचा उद्देश आहे. या अंतर्गत ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापकांसोबत काम करणे आणि त्यांना अध्यापन प्रक्रियेत मदत करणे ही जबाबदारी तरुणांना देण्यात येते. गांधी फेल्लोशीप मध्ये आरोग्य व जल , कृषी ,हे विषय समाविष्ट करण्यात आले आहेत.फेल्लोशीप जिल्हा,राज्य ,तालुका , गाव या पातळीवर काम करते.यामध्ये नीती आयोगासोबत तसेच पंचायत राज , शासन ,शासकीय खासगी सामाजिक संस्था ,विद्यार्थी संस्था इत्यादी यांच्या सोबत मिळून सकारात्मक बदल घडविण्यासाठी , समाजाच्या विकासासाठी काम केले जाते या कार्यक्रमाला आकांक्षी जिल्हा सहयोग कार्यक्रम हे नाव दिले गेले आहे.

फेल्लोशीपची सुरुवात 2008 या वर्षी संस्थापक आदित्य नटराज यांनी राज्यस्थान मध्ये झुंझुण जिल्ह्यात अकरा फेल्लो सोबत घेऊन केली होती.राज्यस्थान येथे बगर मुख्य ऑफिस आहे. सध्या देशात 112 पेक्षा अधिक जिल्ह्यात फेल्लोशीप कार्यरत आहे.आणि सातशेच्या आसपास फेलो सहभागी आहेत. या फेल्लोशीप मध्ये तरुणांना सामाजिक बद्दलबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून दिली जाते तसेच. विश्लेषणात्मक विचार आणि नेतृत्व क्षमता विकसीत केली जाते.ज्यांची फेल्लोशीप मध्ये निवड झाली त्यांच्या रहाणे , खाणे लागणारया खर्चासाठी स्टाइपेंड दिला जातो. यामधे प्रवास , फोन बिल , यांचा सुद्धा समावेश आहे.

गांधी फेल्लोशीप मध्ये सहभागी होण्यासाठी पदवी उत्तीर्ण युवक असणे आवश्यक आहे तसेच समाजबदलासाठी कार्य करण्याची असणे आवश्यक आहे..

अधिक माहितीसाठी http://www.gandhifellowship.org फेल्लोशीपच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.