गांधी टोपी
गांधी टोपी ही पांढऱ्या रंगाच्या कापडाची असते. इ.स.१९१८ पासून गांधीजीनी 'गांधी टोपी' घालायला सुरुवात केली. ती खादीच्या कापडापासून तयार केली जाते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान प्रथमच भारतीय नेते महात्मा गांधी यांनी ही टोपी वापरायला सुरू केल्यामुळे त्यांच्या नावाने ती ओळखली जाते. ती एक प्रतिकात्मक परंपरा बनली.
पुन्हा उदय
[संपादन]इ.स.२०१४ च्या निवडणुकीत, आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते गांधींजींची टोपी घालत होते. इ.स २०११ महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित गांधीवादी अण्णा हजारे यांनी भारतामध्ये भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू केल्यानंतर गांधी टोपी पुन्हा भारतात लोकप्रिय झाली. या चळवळीचा केंद्रबिंदू दिल्लीमध्ये होता.[१] ऑगस्ट २०११ मध्ये अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या वेळी मैदानावर गांधी टोपी घालीत असलेले हजारो लोक एकत्र आले होते. लोक चळवळीने सर्व वयोगट, धर्म आणि सामाजिक स्थिती (मुख्यत्वे मध्यवर्ती वर्ग)च्या लोकांना सहभागी करून घेतले, त्यापैकी बरेच जण घोषणा देत होते आणि त्यांनी गांधी टोपी घातली होती.[१]
वापर
[संपादन]गांधी टोपीचा वापर मध्य प्रदेश येथील नरसिंगपूर जिल्ह्यातील एका शाळेत केला जातो. येथील माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी यांनी निवास केला होता. त्याचे स्मरण म्हणून या शाळेतील विद्यार्थी गणवेशात गांधी टोपीचा वापर करतात.[२] तसेच रघुपती राघव राजाराम या भजनाचा समावेश या शाळेच्या प्रार्थनेत केला आहे.
हे ही पहा
[संपादन]- सोलापूर मार्शल कायदा
- त्र्यंबक शिवराम भारदे
- दौलतराव श्रीपतराव देसाई
- ज्ञान प्रबोधिनी प्रशाला
संदर्भ
[संपादन]बाह्यदुवे
[संपादन]https://www.thehindu.com/2004/04/12/stories/2004041208560300.htm
- ^ "Gandhi cap". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2018-06-21.
- ^ "गांधी जयंती पर विशेष-यहां जिंदा है गांधी टोपी की परंपरा". Patrika News (hindi भाषेत). 2020-10-02 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)