गांडीव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Arjuna throws his weapons in water as advised by Agni.jpg

गांडीव हे महाभारतातील अर्जुनाचे धनुष्य.

अर्जुनाने कृष्णाच्या साहाय्याने जेव्हा खांडववन दहन केले, तेव्हा अग्नीने प्रसन्न होऊन अर्जुनाला "गांडीव" धनुष्य आणि अक्षय भाते दिले. कृष्ण इहलोक सोडून गेल्यावर गांडीव धनुष्याचे सामर्थ्य नष्ट झाले असे विष्णूपुराणात सांगितले आहे.