गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्त्रियांच्या कर्करोगांत प्रमुख कर्करोग हा गर्भाशयाचा आहे. पाळीच्या चक्रात अचानक झालेला बदल, अंगावर पांढरे/लाल किंवा दुर्गंधीयुक्त स्राव जाणे, लैंगिक संबंधांनंतर लाल अंगावर जाणे, लघवी किंवा संडासच्या भावनेत झालेले बदल, मासिक पाळी बंद झाल्यानंतर पुन्हा रक्तस्राव सुरू होणे. सतत बाळंतपणे, लिंगसांसर्गिक आजार, अस्वच्छता, अनेक पुरुषांशी लैंगिक संबंध या काही बाबी गर्भाशय मुखाच्या कर्करोगाशी जास्त निगडित आहेत. म्हणजेच अशा स्त्रियांना या कर्करोगाचा धोका जास्त असतो.यासारखी लक्षणे गर्भाशयाच्या कर्करोगात दिसतात.

कारणे[संपादन]

हा विषाणू लैंगिक संबंधातून पसरतो. जितक्या जास्त व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध असतील तितकी याची शक्यता वाढते.

याबरोबरच धूम्रपान, एच.आय.व्ही. ची लागण, क्लॅमिडिया जंतुदोष, काही हार्मोन्स उदा. गर्भनिरोधक गोळयांचा दीर्घकाळ वापर अशी काही इतर कारणेही दिसून येतात.

कर्करोग झालेल्या सुमारे ७०% स्त्रियांमध्ये ह्यूमन पॅपिलेमा व्हायरस या विषाणूची लागण झालेली सापडते.[१]

सुरुवातीस गर्भाशयाच्या तोंडाला खरबरीतपणा येतो. नंतर फ्लॉवरच्या आकाराची गाठ होते. त्यानंतर गाठीची झपाटयाने वाढ व प्रसार होतो.

पूर्वनिदान[संपादन]

कर्करोगाची गाठ व्हायच्या आतच याचे पूर्वनिदान करता येते.

यासाठी चाळीशीनंतरच्या प्रत्येक स्त्रीच्या गर्भाशयाच्या तोंडाचा नमुना घेतात. त्यात कर्करोगाच्या ‘प्राथमिक’ पेशी सूक्ष्मदर्शकाखाली तपासतात. याला [[[पॅपस्मिअर]]] तपासणी म्हणतात. ही तपासणी अगदी साधी आणि निरुपद्रवी आहे. यात गर्भाशयमुखाला जखम न करता केवळ वरवर खरवडून नमुना घेतला जातो. पॅप तपासणीसाठी शिबिरे घेता येतात आणि एकेका दिवसांत शंभर-दोनशे स्त्रियांची तपासणी करता येते.

पेशी तपासणीत जर कर्करोगाची खूण दिसली तर गर्भाशयाच्या तोंडाचा लहान तुकडा काढतात. याची तपासणी करून निश्चित निदान करता येते.

कर्करोगाची खात्री झाल्यानंतर उपचार ठरतो.[२]

लक्षणे व रोगनिदान[संपादन]

उपचार[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "जननसंस्थेच्या गाठी व कर्करोग – arogyavidya". www.arogyavidya.net (इंग्रजी भाषेत). 2018-10-20 रोजी पाहिले.
  2. ^ Borse, Sandeep Bhakare & Pundlik. "स्त्रियांमधील कॅन्सर... डॉ. सुमती चौगुले". marathi.aarogya.com. 2018-10-20 रोजी पाहिले.