गर्दी
एखाद्या विशिष्ट कारणासाठी किंवा कारणाविना, माणसांच्या अनियंत्रित व अशिस्तबद्ध एकत्र होण्याला गर्दी असे म्हणतात.कोणी यास 'जमाव' असेही म्हणतात. सहसा, थोडक्या लोकांच्या एकत्रीकरणास जमाव असे म्हणतात पण 'थोडक्या' म्हणजे किती हा आकडा ठरविल्या जाऊ शकत नाही.पण कमी लोकं असले तर जमाव व तेथील लोकं वाढले तर गर्दी असे साधारण समीकरण आहे.साधारण स्थिती पेक्षा जास्त जमलेल्या लोकांनापण गर्दी असे संबोधल्या जाते.[ संदर्भ हवा ]
गर्दीची कारणे
[संपादन]सणावारांच्या सुमारास बाजारपेठेत जास्त लोकं खरेदीला आलेले असतात तेंव्हा गर्दी होते.एखादी घटना घडल्यास, अपघात झाल्यास, कोणती गोष्ट विना-खर्चाची मिळत असल्यास, एखाद्या वस्तूचा तुटवडा झाल्यावर ती मिळविण्यास, एखाद्या थोर प्रस्थापित नेत्याला बघण्यास, उच्च पदावरील व्यक्तिस बघण्यास, धार्मिक कारणासाठी, वाहतूक तुंबल्यास, एखाद्या समारोह अथवा संमेलनामुळे अथवा वैयक्तिक समारोहासाठी, अशा अनेक कारणांनी गर्दी तयार होते.[ संदर्भ हवा ]
मानसिकता
[संपादन]गर्दीची आकलनशक्ती ही वैयक्तिक आकलनशक्तीपेक्षा कमी असते.गर्दीचा नैसर्गिक तोल बिघडविण्यास किंवा त्याचे संतूलन नाहिसे होण्यास एखादी छोटीशी घटना अथवा अफवा पुरेसी असते.गर्दीकडे सारासार विवेकबुद्धी नसते असा समज आहे. कोणी त्याप्रकारे विवेकी विचार करणारा असला तरीही त्याचा गर्दीवर काहीच परिणाम होत नाही.तो ऐकण्याच्या मनःस्थितीत गर्दी नसते.गर्दी ही कधीही स्फोट होऊ शकणारी एक प्रकारची आपत्ती असते.ती अनियंत्रित झाल्यास, सामाजिक बंधने झुगारून दिल्या जातात. गर्दी अनियंत्रित झाल्यास, माणसांच्या मनात मी व माझे, माझ्या आप्तांचे (ते गर्दीत असल्यास) अस्तित्त्व, इतकाच विचार मनात असतो.त्यांचे जवळ जाण्यासाठीच्या प्रयत्नामुळे 'चेंगराचेंगरी' हा प्रकार उद्भवतो.[१]
धोके
[संपादन]वाहणाऱ्या गर्दीसमोर एखादा अडथळा अचानकपणे उद्भवल्यास,धोकादायक परिस्थिती निर्माण होते. गर्दीचा वाहण्याचा वेग मंदावतो.त्याचा नैसर्गिक प्रवाह धोक्यात येतो.परिणामी दाब वाढतो.तेथे एक प्रकारची दाबाची लाट निर्माण होते. त्यात मानवी शरीर पुढे ढकलल्या जाते व कपडे व हातात असणारे बॅग आदी सामान मागे खेचल्या जाते.ही अशी लाट वाढली तर,एकमेकांच्या अंगावर पडणे किंवा त्यापुढे, पायदळी तुडविण्याची क्रिया सुरू होते. उच्च पातळीवरची गर्दीची लाट निर्माण झाल्यास, चेंगराचेंगरी व गुदमरणे व पर्यायाने मृत्यू ओढवतो.[१]
एखाद्या विशिष्ट लक्ष्याकडे जाणाऱ्या अथवा धावणाऱ्या गर्दीस इंग्रजीत 'क्रेझ' म्हणतात.[१]
भारतातील घटना
[संपादन]- सन १९८१ मध्ये कुतुबमिनार, दिल्ली येथे अचानक विद्युत पुरवठा खंडल्यामुळे अंधार झाला.त्यामुळे झालेल्या धावपळीत ४५ लोकांचा मृत्यू. त्यातच कोणीतरी कुतुबमिनार पडतो आहे अशी टोकलेली अफवा. यात लहान मुलांची संख्या जास्त होती.[ संदर्भ हवा ]
- सन २०१४ला मुंबईमध्ये बोहरा समाजाचे धर्मगुरू महंमद सैयदना यांचे निधनानंतर, त्यांचे अंत्यदर्शन घेण्याच्या चढाओढीत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे, १८ व्यक्ति दगावल्या.[ संदर्भ हवा ]
- वाढलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची ताजी घटना एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाच्या पुलावरील दुर्घटना
गर्दीमुळे उद्भवणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी उपाय
[संपादन]- गर्दीचा प्रवाह सतत वाहता राहील याची काळजी घेणे.
- सततची उद्घोषणा व मार्गदर्शन पर्यायाने गर्दीच्या घटकातील मानसिकतेत विशिष्ट धारणा वसविणे.
- दिशादर्शक पाट्या
- प्रशिक्षित स्वयंसेवकांचा/पोलिसांचा ताफा
- मार्गातील अरुंद ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी(बॉटलनेक)) गर्दीचे तुकडे/विभाग करणे.तेथे लोकं टप्प्या-टप्प्याने सोडणे.
- समाजात कसे वावरायचे त्याचे सुशिक्षण देणे.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- पुस्तक-'कुशावर्ताचा कोतवाल-एक पर्वणी व्यवस्थापनाची'-लेखक-डॉ. रवींद्रकुमार सिंघल, पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र.प्रकाशक-वॉव मिडिया, नाशिक.