Jump to content

गरीबपूरची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गरीबपूरची लढाई
१९७१चे भारत-पाक युद्ध ह्या युद्धाचा भाग
T-55
T-55
दिनांक नोव्हेंबर २०-२१, इ.स. १९७१
स्थान गरीबपूर, बांगलादेश
परिणती मित्रोबाहिनीचा निर्णायक विजय
युद्धमान पक्ष

बांगलादेश (मुक्तीबाहिनी)

भारत (डिसेंबर ३, १९७१पासून)

पाकिस्तान
सेनापती
भारत लेफ्टनंट कर्नल आर.के. सिंग स्क्वॉड्रन लीडर परवेझ मेहदी कुरेशी
सैन्यबळ
१४वी पंजाब रेजिमेंट, ४५वे घोडदळ १०७वी इन्फंट्री ब्रिगेड, ३रे चिलखती दल
बळी आणि नुकसान
३० सैनिक, ४ रणगाडे १८० सैनिक, ३० रणगाडे, ३ एफ-८६ सेबरजेट

गरीबपूरची लढाई भारत व पाकिस्तानमधील तिसऱ्या युद्धाची नांदी ठरलेली लढाई होती. नोव्हेंबर २०-२१, इ.स. १९७१ला झालेल्या या लढाईनंतर भारतीय सेनेने मुक्तीबाहिनीशी संधान बांधले व मित्रोबाहिनीची रचना केली. पुढील काही दिवसांत झालेल्या बोयराच्या लढाईत मित्रोबाहिनीने पूर्व पाकिस्तानात (आताचे बांगलादेश) असलेल्या पाकिस्तानी वायुसेनेच्या तुकड्यांचा पराभव केला व युद्धास तोंड फुटले.

गरीबपूर आणि बोयराच्या लढायांमध्ये पराभव पत्करलेल्या पाकिस्तानी सैन्यदलाने युद्धाच्या शेवटी भारतासमोर शरणागती पत्करली.