गड्डा यात्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


गड्डा यात्रा.jpg

सोलापुुरची गिरणगाव म्हणून जशी ओळख आहे, तशीच आणखी एका गोष्टीमुळे देखील आहे, ती म्हणजे साडेआठशे वर्षांपासूची ऐतिहासीक परंपरा लाभलेली ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांची गड्डा यात्रा. खरेतर या यात्रेने शहराची वेगळी ओळख निर्माण केली.दरवर्षी होम मैदानावर भरणारी ही आगळीवेगळी यात्रा, त्यासाठी श्रध्देने येणारे लाखो भाविक तसेच हौसे, नवसे, गवशांची गर्दी. नंदिधवजांची मिरवणूक आणि त्या संपूर्ण रस्त्यावर घातली जाणारी मनमोहक रांगोळी .यानिमित्ताने होणारी शहराच्या विविध भागांतील ६८ लिंगाची पूजा, या संपूर्ण कालावधीत सिद्धेश्वर मंदिरात होणारे विविध धार्मिक कार्यक्रम, होम मैदानात थाटली जाणारी दुकाने,उंच पाळण्यांचे फिरते चक्र, मौत का कुव्यासारख्या गोलाकार तंबूत मोटारसायकल चालविण्याचा जीवाचा थरकाप उडविणार शो, उसाच्या राडाची दुकाने,शोभेचे दारुकाम पाहण्यासाठी होणारी होममैदानावरील गर्दी , सिद्धरामेश्वरांच्या विवाहाचा अक्षता सोहळा ,यादरम्यान होणारे सर्व धार्मिक विधी,प्रथा,परंपरा आणि नंदिधवज हाती घेणाऱ्या सर्व समाज बांधवांचा पांढरा शुभ्र पोशाख,आणि भावपुर्ण पद्धतीने केल्या जाणाऱ्या गोष्टी .या आणि अशा अनेक गोष्टींमुळे जवळजवळ एक महिनाभर संपूर्ण शहरात चैतन्याचे वातावरण असते . केवळ ही भाविकांची यात्रा नसून यातून इथल्या श्रमजीवी कुटुंबातील अबालवृद्धांसाठी देखील मनोरंजनाची सोय असते.

आठवण[संपादन]

लहानपणी वडिलांच्या खांद्यावर बसून पाहिलेली जत्रा अजूनही माझ्यासारख्या अनेकांच्या स्मरणात आहे . केवळ सोलापूरतीलच न्हवे तर शेजारच्या आंध्र,कर्नाटकातून,लाखो भाविक येत असल्यामुळे हा धार्मिक सोहळा सांस्कृतिक अंगाने संपन्न होतो.ज्याची ख्याती सर्वदूर पसरली आहे.यांमुळे यात्रेचे वेगळेपण जपत हा संस्कृतीक ठेवा जपला पाहिजे.किंबहुना ती आपली जबाबदारी आहे.इथल्या श्रमजीवी कुटुंबातील आबालवृद्धांसाठी हा सांस्कृतिक ठेवा अधिक समृद्ध करण्याची गरज आहे.जसे भक्तिभाव आणि श्रद्धेला यात्रेत स्थान आहे. त्याचबरोबरीने इथल्या श्रमिकांची सांस्कृतिक भूक भागविणारी गोष्टदेखील आहे.म्हणूनच कष्टकरुंची लहान मुलेही वर्षभर या गड्डा यात्रेची वाट पाहत असतात. गड्डा यात्रेत दिसणारी माणसांची गर्दी ,बालवयातील मुलांसाठी मनोरंजक असते. तसेच जादू,नकला,कसरतीचे खेळ, आशा आनंद देणाऱ्या गोष्टींमुळे आबालवृद्धांसाठी पर्वणीच असते. शहरातील पूर्व विभागातील दोन्ही घरकुले,अक्कलकोट रोड परिसर ,जुळे सोलापूर, हद्दवाढ भाग ,पुणे नाका अशा शहरांच्या चारी दिशांमधून झुंडीच्या झुंडी होम मैदानाकडे यात्रेत सामील होण्यासाठी जाताना पाहतो तेंव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ,विरंगुळ्याची भावना ,मोकळेपणा तसेच शेजारच्या गावांमधून पायी चालत येणाऱ्या सांस्कृतिक भुकेलेल्यांसाठी ही जीवनदायी ऊर्जा चिरंतन टिकून राहिली पाहिजे.नवीन तांत्रिक आणि आभासी जगात हरवत चाललेल्या आजच्या पिढीतील लोकांसाठी एकत्रित येण्याची ही संधी नीटपणे वापरली पाहिजे.या यात्रे मध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येतात .एवढेच न्हवे तर शेजारच्या कर्नाटक तसेच इतर राज्यातील अनेक गावांमधून बैलगाडी,ए स. टी बस तसेच स्वतःच्या गाड्या करून लोक नियमीतपणे दरवर्षी येतात,सिद्धरामेशवराचे दर्शन घेतात आणि भक्तिभावाने परत जातात. श्रमाला प्रतिष्ठा देणाऱ्या बसवेश्वर आणि शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी दाखविलेला अनुभव मंडपाचा मार्ग बदललेल्या परिस्थितीत लोकांसाठी मार्गदर्शक कसा बनविता येईल,याचा विचार करूया.