Jump to content

खोगीर कलम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खोगीर कलम (SADDLE GRAFTING) भेट कलमाप्रमाणे प्रथम खुंटाचे रोप मडक्यात तयार करतात. खुंटाचा शेंडा २२ ते ४४ सेंटीमीटर उंचीवर छाटून घेतात. वरील टोकास २॥ ते ४ सेमी. लांबीचा पाचरीसारखा आकार देतात. नंतर ज्या झाडाचे कलम करावयाचे असेल त्याची फांदी घेऊन त्याच्या बुडख्याकडील भागाला खुंटाची पाचर व्यवस्थित बसेल असा छेद घेतात. खुंटाची पाचर त्या छेदामध्ये घट्ट बसवून केळीचे सोपाटणे व नंतर सुतळीने घट्ट बांधून त्यावर मेण ओततात. कोणत्याही फळझाडाबाबत ही पद्धत मोठया प्रमाणात प्रचारात नाही.