खिरणी
Appearance
खिर्णी किंवा रायन हे आणि चिकू (शास्त्रीय नाव: manilkara hexandra (Roxb.) Dubard sapotaceae) ही एकाच सॅपोटेसी या बकुळीच्या कुटुंबातील आहेत. चिकूचे रोप खिर्णीवर कलम केले तर तग धरू शकते. खिर्णी किंवा रायनचे झाड १२-१५ मीटर उंच वाढणारे, पसरणाऱ्या फांद्यांचे असते. हिरवीगार पालवी फांद्यांच्या टोकांना दाटी करून असते. पान खुडल्यावर किंवा डहाळी तोडल्यावर दुधट चिकाचे थेंब ठिबकतात. फेब्रुवारी – मार्चमध्ये फिकट पिवळ्या रंगाची फुले झाडावर दिसतात. ही फळे चकचकीत पिवळी, लांबोडी गोल असतात. व बाजारात अहमदाबादी मेवा या नावाने विकली जातात. फळे चवीला काहीशी गोड, पण चिकट गराची असतात.
संदर्भ
[संपादन]वृक्षराजी मुंबईची - डॉ.मुग्धा कर्णिक