Jump to content

मावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खवा

म्हशीचे दूध लोखंडाच्या कढईत गरम करून त्यास सतत ढवळत जातात व आटवितात. सततच्या ढवळण्याने दूध, उष्णतेमुळे जळत नाही. हे घट्ट झालेले दूध म्हणजे खवा. तो साधारण किंचीत पिवळसर पांढरा असतो. यात चरबी(फॅट)चे प्रमाण अत्युच्च असते. या पदार्थाचा वापर साखर व रंग घालून मिठाई करण्यासाठी करतात. साधारणतः १ लिटर चांगल्या दुधाचा १२० ते १३० ग्राम खवा बनतो. काही प्रदेशात याला मावा असेही म्हणतात. खव्यापासून पेढे, गुलाबजाम इ. पदार्थ तयार करतात.

खव्यापासून तयार केलेले गुलाबजाम

आत्ता आधुनिकीकरणामुळे पारंपरिक पद्धतीने खवा बनला जात नाही.त्यामुळे त्यात मशीनचा वापर होऊ लागला आहे.त्यामध्ये CNG गॅस आणि लाईट दोन्हींचा वापर करून मशीन बनवल्या आहेत. त्यामुळे आता प्रदूषण ही कमी होण्यास मदत झाली आहे. हलीच्या काळात खव्यासाठी म्हैस आणि गाई या दोन्ही दूधाचा वापर केला जातो.पण प्रामुख्याने म्हैसीच्या दूधाचा वापर जास्त केला जातो.आणि म्हैशीच्या दूधाचा खवा पांढरा शुभ्र होतो.तसेच गाईच्या दूधाचा खवा हा पिवळसर होतो. म्हैसीचे दूध आपण खवा करण्यास वापरले तर आपणास गाईच्या दुधाच्या तुलनेत जास्त फायदा होतो कारण म्हैशीचे दूध हे जास्त घट असते,म्हणजेच फॅटचे प्रमाण जास्त असते. खवा उद्योग हा ग्रामीण भागामध्ये जास्त यशस्वी होऊ शकतो कारण त्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे दूध हे ग्रामीण भागात सहजासहजी उपलब्ध होऊ शकते आणि कमीत कमी किंमतीत मिळू शकते. तसा विचार केला तर खव्यापासून बऱ्याच मिठाई बनवल्या जातात. पेढा, गुलाबजाम,बर्फी तसेच बासुंदी असा विविध मिठाई मध्ये खव्याचा वापर केला जातो.