खरवस
नुकत्याच व्यालेल्या गायीच्या किंवा म्हशीच्या पहिल्या तीन दिवसापर्यंत मिळणाऱ्या घट्टसर दुधापासून(colostrum) खरवस तयार केला जातो.अशा या दुधात 'स्टेम सेल' क्षमतेचे काही घटक असतात.[१]
अशा दुधामध्ये थोडे साधे दूध मिसळून ते उकळले जाते, उकळल्यानंतर पाणी कमी झाल्यावर प्रथिने घट्ट होतात व दुधाचा खरवस तयार होतो. जवळजवळ असाच भासणारा खरवस चायना ग्रास वापरून बनवता येतो.
खरवस बनवण्याची पद्धत
[संपादन]साहित्य
[संपादन]१ लिटर पहिल्या दिवसाचा दुधाचा चीक
१ लिटर दूध
दोनशे ते अडीचशे ग्राम साखर (साधारण १ पाणी प्यायचे फुलपात्रभर)
२-३ चिमटी केशर
१/२ टीस्पून वेलदोड्याची पूड
मोठा कुकर
२ कुकरच्या आतील डबे
कृती
[संपादन]१) केशर अगदी थोडे कोमट करून पाव वाटी दुधात भिजत घालून ठेवावे.
२) चीक आणि दूध एकत्र करून त्यात साखर घालावी. साखर विरघळेस्तोवर ढवळावे. चव पाहून लागल्यास अजून साखर घालावी.
३) वरील मिश्रणात केशर आणि वेलदोड्याची पूड नीट मिसळावी.
४) तयार मिश्रण कुकरमध्ये भात शिजवतो तसेच शिजवून घ्यावे. कुकरचे २ मोठे डबे घ्यावेत. पैकी पहिल्या डब्यात तयार मिश्रण सारखे विभागून घालावे. कुकरच्या तळाशी दीड इंचभर पाणी ठेवावे. तो डबा अलगदपणे पकडीच्या मदतीने आत ठेवावा. त्यावर ताटली ठेवावी. त्याच्या डोक्यावर अजून एक रिकामा डबा ठेवावा. वर परत एक ताटली ठेवावी. झाकण लावून २ शिट्ट्या कराव्यात. आच बारीक करून मिनिटभराने बंद करावी. ५-८ मिनिटांनी कुकरचे प्रेशर गेल्यावर झाकण काढून दोन्ही डबे बाहेर काढावेत. खरवस गार होईस्तोवर हवेवर उघढाच ठेवावा. कोमटसर झाला की खाल्ला तरी चालतो. पण फ्रीजमध्ये गार करून खाल्ल्यास अजून स्वादिष्ट लागतो. खरवस फ्रीजमध्ये ८ दिवस सहज टिकतो.
बाह्य दुवे
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ लेखक: मोरेश्वर जोशी. तरुण भारत नागपूर-ईपेपर-पान क्र. ९, "भूक भागवणारा अमोल ठेवा-निरसे दूध" Check
|दुवा=
value (सहाय्य). १५ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.कृषी भारत पुरवणी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |