क्रो-मॅग्नन मानव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पॅरीस येथील 'म्युझियम ऑफ मॅन' संग्रहालयात ठेवलेली क्रो-मॅग्नन मानवाची कवटी

क्रो-मॅग्नन मानव हा प्रगत मानवाचा पूर्वज आहे. फ्रान्समध्ये क्रो-मॅग्नन नावाच्या गुहेमध्ये इ.स. १८६८ साली सर्वप्रथम या मानवाचे अवशेष सापडले. त्यानंतर इ.स. १८७२ ते इ.स. १९०२ या कालखंडात फ्रान्सबरोबर इटलीमध्येही या मानवाचे अवशेष सापडले. या मानवाचा कालखंड इ.स.पू. ३०००० वर्षे ते इ.स.पू. १३००० वर्षे समजला जातो पण क्रोमॅग्नन मानवाचा उपलब्ध सर्वात प्राचीन अवशेष कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धतीनुसार इ.स.पू. ४३००० वर्षे इतका प्राचीन आहे.[१]

क्रोमॅग्नन मानव साधारणपणे ५ फूट ११ इंच उंचीचा असून त्याच्या कवटीची क्षमता १६०० क्यूबिक सेंटीमीटर होती.[२] सरळ नाक, उंच कपाळ आणि दणकट जबडा ही या मानवाची वैशिष्ट्ये होती. हा मानव गुहेमध्ये राहत असे व तिथे उत्कृष्ट रंगीत चित्रे काढीत असे. फ्रान्समधील दोर्गोन्य विभागातील माँतीनॅक गावाजवळ व्हेझर नदीच्या खोऱ्यात असलेल्या लास्को गुहेत क्रोमॅग्नन मानवाने काढलेली उत्कृष्ट चित्रे असून इ.स. १९७९ साली युनेस्कोने या गुहेचा जागतिक वारसा स्थान म्हणून आपल्या यादीत समावेश केलेला आहे.[३]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ विलफोर्ड, जॉन नोबेल (२ नोव्हेंबर, इ.स. २०११). "Fossil Teeth Put Humans in Europe Earlier Than Thought" [फोसिल टिथ पुट ह्युमन्स इन युरोप अर्लिअर दॅन थॉट]. द न्यूयॉर्क टाईम्स (इंग्रजी मजकूर). ८ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. 
  2. ^ "Cro-Magnon (anthropology) - Britannica Online Encyclopedia" [क्रो-मॅग्नन (अँथ्रापॉलॉजी) ब्रिटानिका ऑनलाईन एनसाक्लोपिडिया]. ब्रटानिका (इंग्रजी मजकूर) (वेब आवृत्ती.). ८ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. 
  3. ^ "Prehistoric Sites and Decorated Caves of the Vézère Valley" [प्रीहिस्टोरीक साईटअ्स ॲन्ड डेकोरेटेड केव्ह्ज ऑफ द व्हेझर व्हॅली] (इंग्रजी मजकूर). युनेस्को वर्ल्ड हेरीटेज सेंटर. ८ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.