Jump to content

१९९२ क्रिकेट विश्वचषक बाद फेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्रिकेट विश्वचषक, १९९२ - बाद फेरी या पानावरून पुनर्निर्देशित)

सारांश

[संपादन]
  उपांत्य सामने अंतिम सामना
             
२१ मार्च - इडन पार्क, ऑकलंड
 न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २६२/७ (५० षटके)  
 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २६४/६ (४९ षटके)  
 
२५ मार्च - मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
     पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २४९/६ (५० षटके)
   इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २२७ (४९.२ षटके)
२२ मार्च - सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २५२/६ (४५ षटके)
 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २३२/६ (४३ षटके)  


उपांत्य फेरी

[संपादन]

न्यू झीलंड वि पाकिस्तान

[संपादन]
२१ मार्च १९९२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२६२/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२६३/६ (४९ षटके)
मार्टीन क्रो ९१ (८३)
वासिम अक्रम २/४० (१० षटके)
मुश्ताक अहमद २/४० (१० षटके)
इंझमाम उल-हक ६० (३७)
विली वॉट्सन २/३९ (१० षटके)
पाकिस्तान ४ गडी राखुन विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: इंझमाम उल-हक (पाकिस्तान)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.

इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका

[संपादन]
२२ मार्च १९९२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२५२/६ (४५ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२३२/६ (४३ षटके)
ग्रेम हिक ८३ (९०)
मेरिक प्रिंगल २/३६ (९ षटके)
इंग्लंड १९ धावांनी विजयी (सर्वाधिक उत्पादक षटक पद्धत).
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: ग्रेम हिक (इंग्लंड)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
  • दक्षिण आफ्रिकेच्या ४३व्या षटकात पावसामुळे व्यत्यय आला. दक्षिन आफ्रिकेला १३ चेंडूत २२ धावा जिंकण्यासाठी आवश्यक होत्या. पावसामुळे २ षटकांचा खेळ वाया गेला, व दक्षिण आफ्रिकेसमोर १ चेंडूत २२ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.


अंतिम सामना

[संपादन]

अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानी महान खेळाडू इम्रान खानजावेद मियांदादने केलेल्या उत्क्रुष्ट प्रदर्शनामुळे, पाकिस्तान संघाने इंग्लंड संघासमोर २५० धावांचे लक्ष्य ठेवले.

साखळी सामन्यात इंग्लंड संघाने पाकिस्तान संघास ७४ धावात बाद केले होते, अंतिम सामन्याची सुरुवात काही प्रकारे तशीच झाली. डेरेक प्रिंगलने दोन्ही पाकिस्तानी ओपनर फलंदाजांना २४ धावातच तंबूत परत पाठवले.परंतु, इम्रान खानजावेद मियांदादने संयमी खेळ केला. सामन्यातील एक महत्त्वपुर्ण घटना तेव्हा झाली जेव्हा ग्रॅहम गूचने इम्रान खान ९ धावांवर खेळत असतांना झेल सोडला. इम्रानने सामन्यात ७२ धावा केल्या. २५ षटके होइ पर्यंत पाकिस्तान संघाने ७० धावा केल्या होत्या. इंजमाम (४२) व अक्रम (३५) ह्यांच्या योगदानामुळे पाकिस्तानने इंग्लंड साठी २५० धावांचे लक्ष्य ठेवले.

इंग्लंडची सुरुवात खराब झाली, ६९ धावांवर इंग्लंडचे ४ फलंदाज बाद झाले. ॲलन लॅम्बनील फेयरब्रदरने ७२ धावांची भागीदारी केली. परंतु वसिम अक्रमने ३५ षटकात ऍलन लॅंब व क्रिस लेविसला बाद केले. पाकिस्ताने अंतिम सामना २२ धावांनी जिंकला.

२५ मार्च १९९२
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२४९/६ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२२७/१० (४९.२ षटके)
इम्रान खान ७२ (११०‌)
डेरेक प्रिंगल ३/२२ (१० षटके)
नील फेयरब्रदर ६२ (७० चेंडू)
मुश्ताक अहमद ३/४१ (१० षटके)
पाकिस्तान २२ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: वसिम अक्रम (इंग्लंड)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • पाकिस्तानने पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषक जिंकला.