कोळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कोळे एक महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे.

कोळे गाव कराड तालुक्यात पश्चिम दिशेला १४ किलोमीटर अंतरावर वांग नदीच्या काठी वसलेले आहे. गावची लोकसंख्या सुमारे १०००० असून गावात हिंदू , मुस्लीम व बौद्ध धर्मीय लोक राहतात. गावात १ मस्जिद आणि सुमारे १० मंदिरे आहेत. गावात श्री घाडगेनाथ महाराज यांचे भव्य व प्राचीन मंदिर आहे. वांग नदीच्या काठी शिव कालीन भुईकोट किल्ला आहे. गावात २ प्राथमिक शाळा व १ माध्यमिक शाळा आहे. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ८०% क्षेत्र बागायती आहे. कोळे गाव अणे ,अंबवडे , येनके ,पोतले इ. गावांची मध्यवर्ती बाजारपेठ आहे, कोळे गाव वांग नदीच्या काठी वसले असून गावाच्या उत्तरेस बुवासाब डोंगर असून त्यावर बुवासाफा चे (पीर )ठिकाण आहे. दक्षिण दिशेला असलेल्या डोंगरावर महादेवाचे मंदिर आहे.