Jump to content

कोलित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोलित म्हणजे जळत असणाऱ्या लाकडाचा अथवा ओंडक्याचा तुकडा असतो.दुर्गम क्षेत्रात आगपेटीअभावी याचा उपयोग आदिवासी हे अग्नी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेण्यास करतात.लाकडाची जंगलात विपूलता असल्यामुळे व योग्य संसाधनांच्या अभावी त्यांना तसे नाईलाजाने करावे लागते.

संध्याकाळी किंवा रात्री जंगलातून जात असतांना, हिंस्र श्वापदांपासून बचाव करण्यासाठीही याचा प्रामुख्याने वापर करण्यात येतो कारण, हिंस्र श्वापदे आगीस घाबरतात.तसेच,इतर ठिकाणापेक्षा जंगलात थंडी जास्त असल्यामुळे व जंगलात राहणाऱ्या आदिवासींपाशी पुरेसे गरम कपडे नसल्यास, याचा वापर मार्गात शेकोटी पेटविण्यासाठीही करण्यात येतो.

सहसा, जंगलसान्निध्यात राहणारी आदिवासी व्यक्ती ही हातात कोलित असल्याशिवाय दुपारनंतर घराबाहेर पडत नाही.