कोकण कन्याळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कोकण कन्याळ ही शेळीची एक जात आहे.महाराष्ट्रातील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाने सतत दहा वर्षे संशोधन करून निळेली पशुपैदास क्षेत्रात ही जात विकसित केली आहे. ही संकरित शेळ्यांची भारतातील २१वी जात आहे. ही जात कोकणातील पावसाळी हवामानामध्ये तग धरू शकते.

या शेळीची सरासरी दररोजची वाढ ६० ते ७० ग्राम आहे. पूर्ण वाढ झालेल्या मादीचे वजन ३० ते ३७ किलो तर बोकडाचे वजन ५० ते ६० किलो इतके असू शकते. ही शेळी दोन वर्षात तीन वेत देते. सरासरी दुधाचे प्रमाण ६० लिटर इतके असते. जुळी करडे होण्याचे प्रमाण या जातीत ४१% इतके आहे.

या शेळीचे खूर उंच, टणक असल्याने डोंगराळ भागात चराई करण्यास ती उत्कृष्ट आहे.ही जात मटनासाठी उत्तम आहे.हिची रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे. हिच्या अंगावर काळे पांढरे ठिपके असतात.