कोकणातील गणेशोत्सव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अग्रशीर्ष मजकूर[संपादन]

कोकणातील गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे.[१]नोकरी उद्योगाच्या निमित्ताने मोठ्या शहरात असलेले कोकणातील मूळ रहिवासी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या मूळ गावी जात असतात.[२][३]

वैशिष्ट्ये[संपादन]

कोकणातील गणेशोत्सव

धार्मिक परंपरेच्या जोडीने हा सण शेतीविषयक सुद्धा आहे. शेतात आलेल्या धान्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा सुद्धा या उत्सवाचा एक हेतू दिसून येतो.[४]

उत्सवाचे स्वरूप[संपादन]

गणेशोत्सवाच्या पूर्वी घरांची स्वछता आणि रंगरंगोटी केली जाते. कोकणात काही मूर्तिकार हाताने गणेशाची मूर्ती घडवितात.घरांमध्ये सजावट केली जाते. फुले आणि फळे यांची आरास केली जाते. गणपतीच्या स्थापनेनंतर प्रत्येक घरात आरती केली जाते. त्यानंतर गावातील समूह मिळून प्रत्येक घरात जाऊन वाद्य वाजवून भजन सादर करतात[५]. नियोजित दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते.[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Campbell, Sir James MacNabb (1883). Gazetteer of the Bombay Presidency: Ka'nara (2 pts.) (इंग्रजी भाषेत). Government Central Press.
  2. ^ शेलार, दीपक (१२. ९. २०१८). "गणेशोत्सवासाठी चाकरमानी निघाले... कोकण रेल्वे फुल्ल". इ- सकाळ. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ Bhāratīya tyohāra (हिंदी भाषेत). Neśanala Buka Ṭrasṭa. 1983.
  4. a b http://www.malvancity.com/festivals-of-malvan/
  5. ^ दामले, दीपक (१४. ९. २०१५). "कोकणचा गणेशोत्सव". |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)