कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय हे महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथील महाविद्यालय आहे. याची स्थापना १९९०मध्ये करण्यात आली.[ संदर्भ हवा ] हे महाविद्यालय दोन भागांमध्ये आहे. एक भाग म्हणजे ज्युनियर कॉलेज आणि दुसरा भाग म्हणजे सीनियर कॉलेज. या महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, व विज्ञान शाखा उपलब्ध आहेत. हे महाविद्यालय महाराष्ट्राच्या एच.एस.सी. बोर्डाअंतर्गत कार्य करते. येथे ११वी ते पदवी पर्यंत शिक्षण दिले जाते. हे लातूर शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर आहे. इथे लातूर, बाभळगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांतून विद्यार्थी शिकायला येतात.