के. राममूर्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वझापडी कुथापड्याची राममूर्ती (जानेवारी १८, इ.स. १९४०- ऑक्टोबर २९, इ.स. २००२) हे काँग्रेस पक्षाचे तामिळनाडू राज्यातील ज्येष्ठ नेते होते. ते तामिळनाडू राज्यातील धर्मापुरी लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तर तामिळनाडू राज्यातीलच कृष्णगिरी लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये निवडून गेले. त्यांनी इ.स. १९९७ मध्ये तमाझिगा राजीव काँग्रेस नावाचा स्वतःचा प्रादेशिक पक्ष स्थापन केला आणि इ.स. १९९८ ची लोकसभा निवडणुक अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम - भारतीय जनता पक्ष युतीबरोबर लढवली. ते त्या निवडणुकीत सेलम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी जून इ.स. १९९१ ते जुलै इ.स. १९९१ या काळात पी.व्ही.नरसिंह राव यांच्या मंत्रीमंडळात कामगारमंत्री म्हणून तर मार्च इ.स. १९९८ ते ऑक्टोबर इ.स. १९९९ या काळात अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात पेट्रोलियम मंत्री म्हणून काम बघितले.