के.व्ही. कामत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(के.व्ही. कामथ या पानावरून पुनर्निर्देशित)

कुंडापूर वामन कामत (२ डिसेंबर, इ.स. १९४७:मंगलोर, कर्नाटक, भारत - ) हे ब्रिक्स बँकेचे पहिले अध्यक्ष आहेत.

कर्नाटकातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून ते मेकॅनिकल इंजिनियर झाले, नंतर त्यांनी अहमदाबादच्या आयआयएममध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली.

के.व्ही. कामत यांची मातृभाषा कोकणी आहे.

कारकीर्द[संपादन]

बँकिंग क्षेत्रातील कामतांची कारकीर्द आयसीआयसीआय बँकेपासून सुरू झाली. नंतर त्यांनी मनिला येथे आशियाई विकास बँकेत काम केले, तो त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय अनुभव होता. १९९६ मध्ये ते पुन्हा आयसीआयसीआय बँकेत आले. इन्फोसिस कंपनीत त्यांनी विविध पदांवर काम केले.

चंदा कोचर यांनी कामतांकरिता आयसीआयसीआय बँकेत काम केले होते.

के.व्ही. कामत यांच्या नेतृत्वाखाली आयसीआयसीआय बँक देशातील दुसऱ्या क्रमांकावर पोचली.

ब्रिक्स बँक[संपादन]

ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका यांना 'ब्रिक्स देश' असे म्हटले जाते. या देशांतील पायाभूत प्रकल्पांना मदत करण्यासाठी 'ब्रिक्स' बँकेची स्थापना करण्यात आली. कामत तिचे पहिले अध्यक्ष आहेत.

या बँकेत चीनचे १०० अब्ज डॉलर इतके भांडवल असल्याने बँकेचे मुख्यालय चीनमध्ये शांघाय येथे आहे.

पुरस्कार[संपादन]

के.व्ही. कामत यांचा २००८ मध्ये भारत सरकारने 'पद्मभूषण' देऊन गौरव केला आहे.