Jump to content

के.एम. अग्रवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कल्याण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

के. एम. अग्रवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कल्याण, मुंबई विद्यापीठाशी संलग्नीत, महाराष्ट्र शासन अनुदानित असलेले हिंदी भाषी जनकल्याण शिक्षण संस्था संचालित, के. एम. अग्रवाल महाविद्यालय याची स्थापना सप्टेंबर, १९९४ रोजी झाली. ऐतिहासिक कल्याण शहरात जेव्हा महाविद्यालयीन प्रवेशाचा प्रश्न बिकट होता तेव्हा कल्याण शहर व आसपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय आधारस्तंभ म्हणून उभे राहिले.. ISO 9001 : 2000 दर्जा प्राप्त असलेल्या महाविद्यालयास २०१५ मध्ये ‘NAAC’ या राष्ट्रीय मूल्यांकन समितीने ‘अ’ श्रेणीचा दर्जा देऊन गौरवण्यात आले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सुसंस्कारीत पिढी घडवून सामाजिक स्तर उंचवणे हे ह्या महाविद्यालयचे प्रथम उद्दीष्ट आहे आणि ह्या बाबतीत महाविद्यालय नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे. ६५००हून अधिक विद्यार्थी असलेल्या या महाविद्यालयात पुढील शाखा उपलब्ध आहेत.

महाविद्यालयातील शाखा

[संपादन]

कनिष्ठ महाविद्यालय

  • कला
  • वाणिज्य
  • विज्ञान

पदवी व पदव्युत्तर महाविद्यालय

  • कला
  • वाणिज्य
  • विज्ञान
  • बी.एसी.आय.टी
  • बी.एम.एस.
  • बी.एसी.कम्प्युटर सायन्स
  • बी.बी.आय.
  • अकाऊंटिंग अँड फायनॅन्स,
  • एम.ए.
  • एम.कॉम.
  • एम.एससी.
  • पी.एच.डी. ( वाणिज्य, अर्थशास्त्र)   

ग्रंथालय

[संपादन]

            डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी ग्रंथालयाबाबत आदर्श अशी नियमावली व मूल्ये सांगितली आहेत त्यानुसार महाविद्यालयाचे सुसज आधुनिक तंत्रज्ञान युक्त्त असे ग्रंथालय आहे. ग्रंथालयात ४०,०००हून अधिक ग्रंथ संपदा आहे.  महाविद्यालयाचे स्वतंत्र वाचनालय आहे. विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक असे स्वतंत्र e-ZONE दालन आहे. ह्या सर्व प्रणालीतून मिळणाऱ्या माहिती मुळे विद्यार्थी व शिक्षक वर्गाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. कुशल ग्रंथालय कर्मचारी वर्गाकडून विद्यार्थ्यांस वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले जाते.

            ग्रंथालय विभागाकडून वर्षभर निरनिराळे कार्यक्रम व उपक्रम राबवले जातात, यातुन विद्यार्थांबरोबर शिक्षकांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होते, तसेच त्यामुळे विद्यार्थांचे भविष्य घडवण्यात ग्रंथालय नेहमीच अग्रेसर असते.

क्रीडा व कला

[संपादन]

            के. एम. अग्रवाल  महाविद्यालयातील लाकडी बनावटीचे  बॅटमिंटन कोर्ट संपूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन केले जाते. अत्याधुनिक सामुग्रीने विकसित आशी व्यायामशाळा महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय व आंतर्राष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान आहे.

            महाविद्यालयात वेगवेगळ्या खेळयांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते  व अंतर महाविद्यालयीन स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन प्रोत्साहित केले जाते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या पदकांवर आपले नाव कोरले आहे. तसेच अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वार्षिक क्रीडा समेलन ही भरवले जाते.

            महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी कला क्षेत्रात देखील उलेखनीय कामगिरी केली आहे. प्रादेशिक नाटक, चित्रपट व टीव्ही मालिकां मध्ये काम करून अनेक विद्यार्थी कलाकार म्हणून नावारूपास आले आहेत त्यामुळे महाविद्यालयाचे नाव एका विशिष्ट स्तरावर पोहचले आहे आणि त्यासाठी त्यांना महाविद्यालयाने वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले आहे.

            महाविद्यालयात अंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा, खाद्य पद्धार्थ, केश भूषा, नृत्य, मेहंदी, रांगोळी अश्या अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते.