केसाळ अळी
केसाळ अळी ही वनस्पतीची/पिकाची पाने खाणारी अळी आहे. हिच्या अंगावर केस असतात म्हणून याचे सर्वसाधारण प्रचलित नाव केसाळ अळी असे आहे. साधारणपणे, यांचे जीवनचक्र पतंग, अंडी, अळी, कोष असेच राहते.
या अळ्या पानातील हरितद्रव्य खातात व त्यामुळे पाने जाळीदार होतात.[१] सबब पिकांची योग्य वाढ होत नाही. शेतीशास्त्रात, या अळ्याचे वर्गीकरण 'पाने खाण्याऱ्या अळ्या' या वर्गात होते.
प्रकार
[संपादन]केसाळ अळीचे अनेक प्रकार आहेत. तिच्या वेगवेगळ्या रंगांमुळे तिला त्यानुसार नावे देण्यात येतात. काही अळ्या या क्वचित काळ्या रंगाच्या असतात. यांना 'कोल्हा' असेही म्हणतात.
- सोयाबिन पिकावर साधारणपणे ज्या केसाळ अळ्या आढळतात, त्यांचा रंग लहान असतांना मळकट पिवळा तर त्या मोठ्या झाल्यावर भुरकट लाल असा होतो. या कीटकाची मादी ही पानाचे खालच्या बाजूस आपली अंडी घालते.[१]या अंड्यांची संख्या ४१५ ते १२४० इतकी राहू शकते. या अळीच्या शरीराची दोन्ही टोके सहसा काळी असतात. या अळ्या पानाच्या मागील बाजूस राहतात व पाने खात असतात.[२]
- सूर्यफुलावर आढळणाऱ्या केसाळ अळीचे नाव 'बिहार केसाळ' अळी असेही आहे. याचे पतंग हे मध्यम आकाराचे व दिसण्यास आकर्षक असे असतात. या अळीचा रंग पिवळसर, फिकट पिवळसर अथवा गुलाबी असतो.[३]
उपाययोजना व नियंत्रण
[संपादन]कीटनाशकाची फवारणी
[संपादन]क्विनॉलफॉस
इतर उपाययोजना
[संपादन]मोठ्या प्रमाणात जंगलतोडीमुळे केसाळ अळ्यांना तेथे खाण्यास अत्यंत कमी राहल्यामुळे, त्यांचा प्रादुर्भाव पिकांवर दिसत आहे. यासाठी सामुहिक प्रयत्न आवश्यक असतात. [४]
जमिनीची खोल नांगरट
[संपादन]या अळीचे जीवनचक्र पूर्ण झाल्यावर याचे कोष जमिनीत सुप्तावस्थेत जातात. जमिनीची खोल नांगरणी केल्यावर ते बाहेर येतात. उन्हाळ्यात प्रखर उन्हामुळे व पक्षांनी वेचून खाल्यामुळे पुढच्या पिढीच्या जीवोत्पत्तीत फरक पडतो.[४]
दीप सापळा
[संपादन]पावसाळ्याच्या सुरुवातीस या अळीच्या कोषांमधून पतंग बाहेर येतात. दीप सापळा हा अशा पतंगांना आकर्षित करतो. या सापळ्याखाली अथवा शेतात दिवा लाऊन त्याखाली रॉकेल मिश्रित पाणी असलेले घमेले ठेवल्यास त्यात या अळीचे व इतरही पतंग पडून मरतात.[४]
शेतकडेचा चर
[संपादन]शेताच्या चहूबाजूस पाणी साचणारा चर खणून त्यात कीटनाशक टाकावे. त्यामुळे दुसऱ्या शेतातून येणाऱ्या लहान अळ्यांवर नियंत्रण राखता येते.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "सोयाबीन पिकातील कीड नियंत्रण-केसाळ अळी:". ०३-०२-२०१९ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ प्रा. डॉ. वि.सु. बावसकर. "सोयाबीन पिकावरील कीड नियंत्रण:ब) पाने खाणाऱ्या अळ्या :२) केसाळ अळी". ०३-०२-२०१९ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ प्रा. सु.र. जोशी,डॉ. ला.रा. तांबडे. "सुर्यफुल लागवडीचे सुधारीत तंत्रज्ञान" (PDF). ०३-०२-२०१९ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ a b c d तरुण भारत, कृषी भारत पुरवणी "केसाळ अळीचं नियंत्रण" Check
|दुवा=
value (सहाय्य). ०३-०२-२०१९ रोजी पाहिले.|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)