केरळ पर्यटन
केरळ राज्य आपल्या अमर्याद निसर्गसौंदर्य, किनारे, बैकवाटर, लहान-मोठे तलाव, कॉफीच्या बागा, हत्तींचे कळप, थंड हवेची ठिकाणे या व अशा बऱ्याच वैशिष्ठ्यांमुळे दरवर्षी लाखो पर्यटकांना आपल्याकडे आकर्षून घेते.
केरळ बद्दल अधिक माहिती
[संपादन]केरळ राज्याची निर्मिती १ नोव्हेंबर १९६१ रोजी झाली.थिरूवनंतपुरम ही केरळची राजधानी असून थिरूवनंतपुरम,कोची,कोळिकोड,कोल्लम,थ्रिसूर,कन्नूर,अल्लेप्पी,कोटायम,पल्लकड,मल्लपुरम ही काही महत्त्वाची शहरे आहेत.
‘Kerala- Gods own Country’ या शीर्ष ओळीसह केरळ ने पर्यटन क्षेत्रात मोठी प्रगती केली असून देशाच्या पर्यटन उद्योगामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
केरळ हे देशांतर्गत तसेच परदेशी पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. शहरे व खेड्यांना जोडणाऱ्या नदी, किनारे, तलाव व कालवे यांच्या बैकवाटर मधील पर्यटनासाठी,मुन्नार,थेकडी येथील कॉफी मसाल्याच्या बागा, आयुर्वेदिक केरळी मसाज साठी दरवर्षी असंख्य पर्यटक केरळला भेट देतात.
‘देवभूमी’ अशी ओळख असलेल्या केरळ मध्ये आपल्याला समृद्ध जैव-विविधते बरोबरच सांस्कृतिक ठेवा जपलेला पाहायला मिळतो.
हनिमून ट्रीप असुद्या अगर कौटुंबिक,सुट्टीमध्ये फिरण्यासाठी अनेक पर्यटन स्थळे केरळ मध्ये आहेत.निसर्गरम्य वातावरणाबरोबरच मनःशांतीचा अनुभव केरळ मध्ये नक्कीच मिळतो.[१]
केरळ मधील पर्यटन स्थळे
[संपादन]त्रिवेन्दम/तिरुवनंतपुरम, अल्लेप्पी,मुन्नार, कोची, वर्कला, पेरियार नेशनल पार्क, पलक्कड, कोळिकोड, कुमारकोम, पूवर, कोवलम, आणि त्रिशूर.
केरळला कसे जावे?
[संपादन]दक्षिण भारतातील केरळ हे राज्य पर्यटनामध्ये अग्रेसर असल्याने वाहतूक व दळणवळणाच्या चांगल्या सोयी मिळतात.विमानमार्ग, लोहमार्ग व रस्तामार्ग तिन्ही प्रकारे केरळला जाता येते.
१)विमानमार्ग: (By flight): केरळ मधील कोची(cok),थिरूवनंतपुरम(trv)व कोळिकोड(ccj) हे तीन प्रमुख विमानतळ असून कोची व थिरूवनंतपुरम या दोन्ही विमानतळा वरून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानसेवा नियमित सुरू असते,तर कोळिकोड या विमानतळावरून देशांतर्गत व आखाती देशांसाठी विमानसेवा उपलब्ध असते.
२)लोहमार्ग: (By Railway): केरळ मधील थिरूवनंतपुरम(TVC),एर्नाकुलम(ERS),कोल्लम(QLN),कोळिकोड(CLT) ही प्रमुख रेल्वे स्थानक असून देशातील मुंबई,दिल्ली,कोलकाता,चेन्नई या प्रमुख शहरांशी लोहमार्गाने जोडले गेले आहेत.
राजधानी,दुरोन्तो,मेल एक्सप्रेस अशा जलद व आरामदायी रेल्वे केरळला जाण्यासाठी उपलब्ध असतात.केरळ मध्ये इतर २०० रेल्वे स्थानक असून राज्यांतर्गत रेल्वे प्रवास सहजतेने करता येतो.
३)रस्ता मार्गाने (By road): केरळ मध्ये रस्त्यांचे जाळे उत्तम असून मोटारीने अथवा बस ने पर्यटन करणे पर्यटक पसंत करतात.कधी समुद्राकडेने तर कधी गर्द हिरव्या वनराईतून,कधी बै क वाटरच्या कडेने तर कधी कॉफीच्या मळ्यातून प्रवास करणे हा सुखद अनुभव असतो.
निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी व कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी वेळोवेळी मोटार थांबवावी लागते.शेजारच्या कर्नाटक,तामिळनाडू व गोवा या राज्यातून केरळ साठी राज्य परिवहन मंडळाच्या आरामबस व खासगी वोल्वो बस नियमित सुटतात.[२]
संदर्भ
[संपादन]- ^ "Kerala Tourism". २०२४-०६-०७ रोजी पाहिले.
- ^ केरळ मधील पर्यटन स्थळे Archived 2020-10-14 at the Wayback Machine.