केंतों मोमोता
Appearance
वैयक्तिक माहिती | |
---|---|
जन्म दिनांक | १ सप्टेंबर, १९९४ |
जन्म स्थळ | कागावा, जपान |
उंची | १.७५ मी (५ फूट ९ इंच) |
वजन | ६८ किलो (१५० पौंड) |
देश | जपान |
हात | डावा |
पुरुष एकेरी | |
सर्वोत्तम मानांकन | 1 (2018) |
सद्य मानांकन | 1 (22 November 2021) |
स्पर्धा | ३६४ विजय, ८४ पराजय |
केंतों मोमोता हा एक डावखुरा जपानी बॅडिंटनपटू आहे. तो जपानच्या सर्वोत्तम बॅडमिंटनपटूंपैकी समजला जातो. त्याच्या नावावर दोन जगजेतेपदे, दोन आशियायी करंडक जेतेपदे, व एक ऑल इंग्लंड जेतेपद आहे.[१]
जपानच्या कागावा जिल्ह्यात १ सप्टेंबर १९९४ रोजी मोमोताचा जन्म झाला. त्याच्या वडिलांनी त्याचे नाव क्लार्क केंट उर्फ सुपरमॅनच्या नावावरून 'केन्तो' असे ठेवले. त्याने वयाच्या सातव्या वर्षी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली
२०१८ साली मोमोता पुरुष एकेरीच्या जागतिक क्रमवारीत सर्वोच्य स्थान प्राप्त करणारा पहिला जपानी खेळाडू ठरला. २०१९ साली ११ आंतरराष्ट्रीय जेतेपदे पटकावून त्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये एका वर्षात सर्वाधिक पुरुष एकेरीच्या जेतेपदांचा विश्वविक्रम नोंदवला.[२]