कॅनरी पक्षी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॅनरी पक्षी (शास्त्रीय नाव:सेरिनस कॅनॅरिया) हे एक छोटा पक्षी आहे. रानटी कॅनरीचे मूलस्थान आफ्रिकेच्या अटलांटिक किनाऱ्याजवळील अझोर्स, मदैराकॅनरी बेटे असून तो तेथे मुबलक आढळतो. फ्रिंजिलिडी पक्षिकुळातला हा एक गाणारा पक्षी आहे. या माणसाळलेल्या व पाळीव पक्ष्याच्या काही प्रमुख जाती व कित्येक संकरज जाती आहेत.

शरीर रचना[संपादन]

  1. रंग पिवळसर असून त्यात करडी छटा असते.
  2. मादीचा रंग हिरवट असतो.
  3. कपाळ व शरीराची खालची बाजू पिवळी असते.
  4. काही पाळीव कॅनरी पिवळ्या जर्द रंगाचे असतात.