Jump to content

कृष्ण थिरथिरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कृष्ण थिरथिरा
शास्त्रीय नाव
(Phoenicurus ochruros rufiventris)
कुळ जल्पकाद्य
(Muscicapidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश
(Black Redstart)
Black redstart, Sector 38 West, Chandigarh, India
Black redstart, Phase 7, Mohali, Punjab ,India


कृष्ण थिरथिरा साधारणपणे १५ सें. मी. आकाराचा पक्षी असून नराचे डोके, पाठ, पंख व छातीचा भाग काळा, पोटाचा भाग नारिंगी, सतत हलणारी शेपटी नारिंगी-तपकिरी रंगाची असते तर मादी फिकट तपकिरी रंगाची असते. कृष्ण थिरथिरा हा शेपटी नाचवत किडे शोधत फिरत राहणारा पक्षी आहे.

उन्हाळ्यात उत्तर भारतात हिमालयाच्या गढवाल भागापासून नेपाळ पर्यंत राहणारा हा पक्षी हिवाळ्यात उर्वरीत भारतभर तसेच बांगलादेश मध्ये आढळतो. कृष्ण थिरथिराचे काही जातभाई युरोप मध्येही आढळतात. ते वरील कृष्ण थिरथिरा पेक्षा रंगाने वेगळे आहेत. पण आकार आणि सवयी साधारणपणे सारख्याच आहेत.

कृष्ण थिरथिरा दगडी माळराने, बागा, जंगलाच्या बाहेरील हद्दीत राहणारा पक्षी आहे.

मे ते ऑगस्ट हा याचा वीणीचा हंगाम असून मादी एकावेळी निळसर-हिरवट रंगाची ४ ते ६ अंडी देते. याचे घरटे गवत, केस, कापूस, पिसे इ. वस्तुंपासून बनलेले असते. सहसा घरटे एखाद्या मोठ्या खडकाखाली किंवा जमिनीत असते. युरोपियन कृष्ण थिरथिराचे घरटे जुनाट घरांच्या भिंतींमध्येही आढळले आहेत.

चित्रदालन
इंग्रजी नाव Black Redstart
शास्त्रीय नाव Phoenicurus ochruros rufiventris
Phoenicurus ochruros gibraltariensis