कृष्णाकुमारी
Appearance
मेवाडच्या भीमसिंह राण्याची सौंदर्यसंपन्न मुलगी. तिच्या आईचे नाव चांदबाई होते. कृष्णाकुमारीच्या सौंदर्यामुळे जोधपूरचा मानसिंग आणि जयपूरचा जगतसिंग यांच्यात तेढ निर्माण होऊन भांडण जुंपले.
या आपत्तीतून सुटण्याकरिता भीमसिंहाने तिच्या आईच्या हातून तिला विष पाजविले. ते तिने कलह टाळण्यासाठी शांतपणे घेतले. त्याचा परिणाम न झाल्यामुळे तिला नंतर कुसुंब्याचा रस पाजण्यात आला. तो ती घेऊन झोपली ती कायमचीच.