कृषी साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कृषी साहित्य संमेलन या नावाने अनेक संस्था संमेलने भरवतात. त्या संस्थांमध्ये एकवाक्यता नसल्याने संमेलनांचे अनुक्रम लावणे शक्य नाही. प्रत्येक संस्था आपलेच संमेलन १ले आहे असा दावा करते.

  • १ले अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन नाशिक येथे नोव्हेंबर २०११ मध्ये होणार होते. संमेलनाध्यक्ष डॉ. विठ्ठल भिकाजी वाघ असणार होते.
  • १ले कृषी साहित्य संमेलन, सोलापूर येथे २३ एप्रिल २०११; उद्‌घाटक आणि संमेलनाध्यक्ष डॉ. विठ्ठल भिकाजी वाघ होते.
  • एक कृषी साहित्य संमेलन कुंडलवाडी येथ २९ एप्रिल (सन?)ला झाले. संमेलनाध्यक्ष आमदार वामनराव चटप होते.
  • २४ फेब्रुवारी २०१३ रोजी नाशिक येथे पहिले अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.
  • महाराष्ट्र राज्य सरकारचा कृषी विभाग आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रतिष्ठानचालित कृषी विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथॆ २४-२६ जानेवारी २०१४ या काळात कृषी साहित्य संमेलन झाले. रा रं. बोराडे हे संमेलनाध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे कृषी आणि पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते..
  • ३रे अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन २१-२२-२३ एप्रिल २०१५ या काळात औरंगाबादला भरले होते.
  • पहिले राज्यस्तरीय फुले-आंबेडकरी कृषी साहित्य संमेलन यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील माणुसदरी येथे १६ व १७ मार्च २०१६ झाले. या संमेलनातील सर्व कार्यक्रम केवळ शेती व शेतकऱ्यांशी निगडित होते. लोकजागृती मंच, पंचायत समिती घाटंजी व शांतिदूत बुद्धविहार समिती माणुसदरी यांच्या संयुक्त पुढाकारने हे संमेलन झाले. त्यासाठी आदिवासी बहुल माणुसदरी गावात वसंतराव नाईक साहित्यनगरी वसविण्यात आली होती. संमेलनाध्यक्ष मुंबईचे मोतीराम कटरे होते.
  • राज्यस्तरीय लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलन, बारामती


पहा : साहित्य संमेलने