कुर्स्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुर्स्क (रशियन:Курск) हे रशियाच्या कुर्स्क ओब्लास्तच्या राजधानीचे शहर आहे. हे शहर कुर, तुस्कार आणि सेइम नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,१५,१५९ इतकी होती.

पुरातत्त्वीय पुराव्यांनुसार इ.स.पू.च्या ४थ्या व ५व्या शतकांपासून कुर्स्कच्या आसपास मनुष्यवस्ती आहे. लिखित इतिहासात कुर्स्कचा उल्लेख इ.स. १०३२मध्ये पहिल्यांदा येतो. इगोरच्या मोहीमांची कहाणी या ग्रंथात या शहराचा उल्लेख सेव्हेरियातील एक शहर असा आहे.."[१]

दुसऱ्या महायुद्धादरम्यान कुर्स्क शहर व आसपासच्या प्रदेशात रशियन आणि जर्मन रणगाड्यांमध्ये घनघोर लढाई झाली. अकरा दिवस चाललेल्या या लढाईत सव्वा दोन लाख सैनिक मृत्युमुखी पडले. येथे मिळालेल्या सरशीनंतर रशियन सैन्याने जर्मन सैन्यावर कुरघोडी करत मागे हटवण्यास सुरुवात केली व रशियावरील जर्मन आक्रमणाची पीछेहाट सुरू झाली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]