कुमार शिराळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुमार शिराळकर

कुमार शिराळकर हे महाराष्ट्रातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आहेत. २०१४ पर्यंत त्यांनी पक्षाच्या राज्य आणि केंद्रीय कमिटीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. कॉ. सिताराम येचूरी यांच्या नेतृत्वाखाली चीनला गेलेल्या भारतातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिष्टमंडळाचे ते सदस्य होते. हे महाराष्ट्रातील शोषित, श्रमिक, शेतमजूर, दलितांच्या चळवळींबरोबर काम करतात. १९७४ साली शिराळकर यांची उठ वेडया, तोड बेड' ही पुस्तिका प्रकाशित झाली. या पुस्तकाच्या हजारो प्रती खपल्या आहेत. जाती अंताची लढाई, महाराष्ट्रातील साखर उद्योग, ऊस शेती व ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न, वनाधिकार कायद्याची मिमांसा, आदिवासींचे जीवन, राष्ट्रीय रोजगार हमी कायदा आणि धर्मांधतेचे राजकारण इत्यादी विषयांवर शिराळकर यांनी लिखाण केले आहे. पुण्यातील चालणाऱ्या मागोवा गटाचे ते सदस्य आहेत. नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी, शेतमजूर यांच्यावरील शोषणाविरोधात आणि आदिवासींना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी १९७०च्या दशकात त्यांनी काम केले.