Jump to content

किसान दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

किसान दिन हा दरवर्षी भारतात २३ डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा हा जन्मदिवस किसान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी किसान घाटावर त्यांना सलामी दिली जाते. शासनाकडून वेगवेगळी प्रदर्शने आणि शेतीसंबंधित कार्यशाळा आयोजित केल्या जातात.