किलोबाईट
Appearance
किलोबिट याच्याशी गल्लत करू नका.
| बिट व बाईटचे उपसर्ग | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
किलोबाईट हे संगणकाची स्मरण क्षमता तसेच माहिती मोजण्याचे एक एकक आहे.
सामान्यतः एक किलोबाईट म्हणजे १००० बाईट्स (दशमान पद्धत (SI)) किंवा १०२४ बाईट्स (द्विमान पद्धत). किलोबाईट संक्षिप्त स्वरूपात kB, KB, K, Kbyte असे लिहिले जाते.
अर्थाबाबत संदिग्धता
[संपादन]नक्की किती बाईट म्हणजे एक किलोबाईट याबाबत संगणक सामुग्री उत्पादकांमध्ये तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये एकमत नाही आहे. उदाहरणादाखल-
- बहुतांश संगणक विदागार उत्पादक (Disk-drive Manufacturers) दशमान पद्धत वापरतात. (१ किलोबाईट = १००० बाईट)[१]
- संगणक स्मरण विदा (Computer Memory, RAM) सहसा द्विमान पद्धतीनुसार मोजली जाते. (१ किलोबाईट = १०२४ बाईट) [१]
अनेक आतरराष्ट्रीय प्रमाण संस्था (SI, IEC) खालील विभागणी सुचवतात.