किरवंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

"किरवंत" म्हणजे स्मशानकर्म करणारा ब्राह्मण जातीचा पुरुष. ‘किरवंत’ हा कोकणी शब्द आहे. मूळ शब्द ‘क्रियावंत.’ [१]प्रेमानंद गज्वी यांनी या विषयावर १९८१ साली नाटक लिहिले. एखाद्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही तर थेट दर्भाचा कावळा करून पिंडस्पर्श घडवून आणला जातो. हे घडवून आणणारी व्यक्ती म्हणजे ‘किरवंत’!

मृत्यूपश्चात १३ दिवसांचे अंत्यविधी पार पाडण्याचं काम या ‘किरवंत’ ब्राह्मणाचे असते. ते एकदाचं पार पडलं, की हाच ‘देवतुल्य’ ब्राह्मण यजमानाच्या दृष्टीनं ‘अस्पृश्य’ ठरतो. या ब्राह्मणाच्या ‘अस्पृश्य’पणाची कथा आणि व्यथा म्हणजेच ‘किरवंत’ हे नाटक. भारतीय समाजात अस्पृश्यांचं जे स्थान आहे, तेच ब्राह्मण जातीत किरवंताचे असते. स्मशानकर्म संपले की जातीने ब्राह्मण असलेला हा ब्राह्मण ब्राह्मण जातीत अस्पृश्य मानला जातो, या विषयाला गज्वी यांनी नाटकाद्वारे वाचा फोडली.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ ‘किरवंत’.. एका वेदनेचं शल्य!,प्रेमानंद गज्वी यांची मुलाखत, http://www.loksatta.com/lokrang-news/marathi-dramas-in-1990-kirvant-1064910/, ०१ फेब्रुवारी २०१६ रोजी पाहिले.