किरण मझुमदार-शॉ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
किरण मझुमदार-शॉ

किरण मझुमदार-शॉ (जन्म २३ मार्च १९५३) एक भारतीय उद्योजिका आहे. बंगलोरमध्ये असलेली बायोटेक्नॉलॉजी कंपनी, बायोकॉन लिमिटेड चा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत, आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगलोर, चा अध्यक्ष ही आहेत. २०१४ मध्ये, विज्ञान आणि रसायनशास्त्राच्या उत्कृष्ट योगदानासाठी तिला ओथर गोल्ड मेडल ही मिळाले. २०१५ मध्ये फोर्ब्स ने जगातील ८५ वी शक्तिशाली महिला म्हणून तिची नोंद केली होती, तर २०१६ व २०१७ मध्ये फोर्ब्स ने पुन्हा यादी प्रसिद्ध केली तेव्हा ती अनुक्रमे ७७ व ७१ व्या स्थानावर होती.

सुरुवातीचे जीवन[संपादन]

किरण मझुमदार-शॉ यांचा जन्म २३ मार्च १९५३ रोजी बंगलोर येथे झाला. किरण यांनी बिशप कॉटन गर्ल्स हायस्कूल मध्ये आपले शिक्षण १९६८ साली पूर्ण केले. बंगलोर युनिवर्सिटी मधून बी.एस.सी ची डिग्री घेतली. त्यानंतर त्यांनी १९७५ मध्ये मॉल्टिंग आणि ब्रूइंग या विषयावर बैलेरैट कॉलेज, मेलबोर्न यूनिवर्सिटी, (ऑस्ट्रेलिया) येथे शिक्षण घेतले. किरण यांनी ऑस्ट्रेलियाचा बॅरेट ब्रदर्स आणि बर्स्टोन येथे प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले होते, तर कोलकाता येथे जूपिटर ब्रुअरीज लिमिटेड मध्ये तांत्रिक सल्लागार म्हणून आणि १९७५ ते १९७७ या काळात बडोदाच्या स्टैंडर्ड मॉल्टिंग कॉरपोरेशनमध्ये तांत्रिक संचालक म्हणून काम केले.

बायोकॉन[संपादन]

१९७८ मध्ये, त्या आयर्लंडचा कॉर्क बायकॉनकैमिकल्स लिमिटेड मध्ये एक प्रशिक्षक व्यवस्थापक म्हणून जोडल्या गेल्या. त्याच वर्षी त्यांनी १०,००० रुपये भांडवलासह एका भाड्याचा गॅरेज मध्ये बायोकॉनची सुरुवात केली.

सुरुवातीला त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. कोणतीही बँक त्यांना कर्ज देण्यास तयार नव्हती, समस्या फक्त पैसाची नव्हती तर कामावर नवीन लोकांना नियुक्त करणेही अवघड होते. तिचे पहिले कर्मचारी एक निवृत्त गॅरेज मेकॅनिक होते. तसेच, तिला अस्थिर पायाभूत सुविधा असलेल्या देशातील बायोटेक व्यवसायाची उभारणी करण्याच्या संबंधातील तांत्रिक आव्हानांचा सामना करावा लागला. निरंतर ऊर्जा, उच्च गुणवत्तायुक्त पाणी, निर्जंतुकीकरण प्रयोगशाळा, आयात केलेले संशोधन साधने आणि कामगार त्यावेळी आधुनिक वैज्ञानिक कौशल्ये भारतामध्ये सहज उपलब्ध नव्हती. किरण कोणत्याही गोष्टीला सहज जाऊन देत नव्हती, म्हणून तिने खूप अडचणींचा सामना केला आणि बायोकॉनला नवीन प्रगतीचा उंचाईवर नेऊन ठेवले.

पुरस्कार[संपादन]

  • ओथर गोल्ड मेडल - २०१४ मध्ये त्यांना ओथर गोल्ड मेडल ने सन्मानित करण्यात आले. हे मेडल मिळवणारी भारतातील पहिली महिला आहे, व जगातील तिसरी महिला आहे.

संदर्भ[संपादन]

http://www.itshindi.com/kiran-majumdar-shaw.html (हिंदी मजकूर)

http://www.famous-entrepreneurs.com/kiran-mazumdar-shaw (इंग्लिश मजकूर)

https://www.bhaskar.com/union-territory/new-delhi/news/UT-DEL-HMU-NEW-kiran-majumdar-shaw-success-story-5320941-PHO.html

https://www.britannica.com/biography/Kiran-Mazumdar-Shaw

https://www.bbc.com/hindi/india/2012/07/120717_empowered_indian_women_sm.shtml