काश्मिरी गोजा
Appearance
काश्मिरी गोजा किंवा काश्मिरी गप्पीदास (इंग्लिश:Isabelline Chat) हा एक पक्षी आहे.
याची भुवई व डोळ्यांचे कडे पिवळे असलेला राखी तपकिरी वर्णाचा असतो. शेपटीवरील भाग व पार्श्वाचा भाग पांढरा व शेष शेपटीचा रंग काळसर तपकिरी व डोके पिवळट असते. खालील भागाचा रंग सायीसारखा. छाती आणि दोन्ही अंगाचा रंग गर्द असतो. नर-मादी दिसायला सारखे असतात.
वितरण
[संपादन]ते पाकिस्तान व वायव्य भारतात हिवाळ्यात आढळतात. वाराणशी, सेहोरे, अहमदनगर व पुणे या भागांत भटकलेली आढळून येतात. नेपाळ, मालदीव आणि श्रीलंका या भागांत स्थलांतर करताना आढळून आले.
निवासस्थाने
[संपादन]ते वाळवंटी प्रदेश आणि झुडपे असलेली माळराने या ठिकाणी राहतात.
संदर्भ
[संपादन]- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली