काव्येतिहास-संग्रह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काव्येतिहास-संग्रह हे इतिहास तसेच मराठी-संस्कृत काव्य या विषयांना वाहिलेले मासिक होते‌. जानेवारी १८७८ ला ह्या मासिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. ऐतिहासिक मराठी-संस्कृत काव्ये तसेच कागदपत्रे व बखरी या मासिकातून क्रमशः प्रसिद्ध होत असत. का.ना.साने, विष्णुशास्त्री चिपळूणकर, ज.बा.मोडक यांनी या मासिकाची स्थापना केली व हे तिघेही संपादक होते. मोडक संस्कृत काव्य, चिपळूणकर मराठी काव्य तर साने इतिहास विषयक भागाचे काम पाहत असत.

अंक[संपादन]

काव्येतिहास-संग्रहाचा पहिला अंक जानेवारी १८७८ ला प्रसिद्ध झाला तर डिसेंबर १८८८ ला शेवटचा अंक प्रकाशित होऊन याचे प्रकाशन थांबवण्यासाठी आले. जानेवारी ते डिसेंबर महिन्यांचे वर्षाला १२ असे ११ वर्षात १३२ अंक प्रसिद्ध झाले. प्रत्येक अंक साधारणपणे ४०-५० पृष्ठ संख्येचा असे. पुणे येथून ज्ञानप्रकाश मुद्रणालयातून छापून प्रसिद्ध होत असे.

राज्य मराठी विकास संस्थेने या अंकाचे डिजिटायझेशन केले असून संस्थेच्या संकेतस्थळावर हे अंक मोफत उपलब्ध आहेत.

काव्येतिहास-संग्रहात प्रसिद्ध झालेले ग्रंथ[संपादन]

महाराष्ट्र इतिहास[संपादन]

मराठी काव्य[संपादन]

संस्कृत काव्य[संपादन]

संदर्भसूची[संपादन]