Jump to content

कार्ल जी. जान्स्की व्हेरी लार्ज ॲरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कार्ल जी. जान्स्की व्हेरी लार्ज ॲरे
व्हेरी लार्ज ॲरे (व्ही.एल.ए)
संस्थानॅशनल रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी ऑब्झर्व्हेटरी
स्थळसोकोरो, अमेरिका
निर्देशांक34°04′43.497″N 107°37′05.819″W / 34.07874917°N 107.61828306°W / 34.07874917; -107.61828306[]
उंची२१२४ मी (६९७० फूट)
तरंगलांबीरेडिओ, ०.६–४१० सेंमी (५० GHz–७३ MHz)
स्थापना१९७३–१९८०
दूरदर्शक श्रेणी इंटरफेरोमीटर
व्यास२७ × २५मी
कोनीय विभेदन ०.२ ते ०.००४ विकला (")
संग्रहण क्षेत्रफळ१३.२५ किमी (f/0.36)
संकेतस्थळwww.vla.nrao.edu



कार्ल जी. जान्स्की व्हेरी लार्ज ॲरे (व्ही.एल.ए) ही अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील सोकोरो शहराच्या पश्चिमेकडे ८० किमी अंतरावर प्रस्थापित केलेली एक रेडिओ दुर्बीण आहे. या दुर्बिणीमध्ये Y-आकाराच्या शृंखलेमध्ये २५-मीटर व्यासाच्या २७ दुर्बिणी आहेत. यांपैकी प्रत्येक भव्य दुर्बीण, गरजेनुसार शृंखलेचा आकार कमी-जास्त करण्यासाठी हलवता यावी यासाठी रेल्वेच्या समांतर पट्ट्यांवर ठेवली आहे. व्ही.एल.ए.चा वापर करून खगोलशास्त्रज्ञांनी कृष्णविवरे आणि तरुण ताऱ्यांभोवतीच्या ग्रहनिर्मितीपूर्वीच्या चकत्यांची महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. त्याचबरोबर आपल्या आकाशगंगेच्या केंद्राजवळील वायूच्या क्लिष्ट हालचालींचे निरीक्षण केले आहे; नवीन चुंबकीय तंतू शोधले आहेत; विश्वाच्या वैश्विक प्राचलांची तपासणी केली आहे आणि रेडिओ उत्सर्जन निर्माण करणाऱ्या भौतिक प्रक्रियांसंदर्भात नवीन ज्ञान उपलब्ध करून दिले आहे.

गॅलरी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "ॲन ओव्हरव्ह्यू ऑफ द व्हेरी लार्ज ॲरे (An Overview of the Very Large Array)". vla.nrao.edu. २०१६-03-24 रोजी पाहिले.