कार्बन तटस्थता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कार्बन तटस्थता म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे वातावरणात उत्सर्जन होण्याचे प्रमाण आणि वातावरणातून कार्बन डायऑक्साईड काढून टाकण्याचे प्रमाण यांचे योग्य संतुलन साधून निव्वळ शून्य कर्बभार साध्य करणे. [१]

परिवहन, ऊर्जा उत्पादन, शेती आणि औद्योगिक प्रक्रियांशी संबंधित कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन प्रक्रियेच्या संदर्भात या संकल्पनेचा वापर केला जातो.

कार्बन तटस्थता खालील दोन प्रकारे साध्य केली जाऊ शकते:[संपादन]

  1. विविध उपाययोजना करून कार्बन डायऑक्साईड आणि इतर ग्रीनहाऊस वायूंचे उत्सर्जन कमी करणे - उदा. ऊर्जा स्रोत आणि उद्योग प्रक्रिया यांमध्ये बदल करणे. नूतनीकरणयोग्य / शाश्वत ऊर्जा (उदा. पवन आणि सौर ) स्रोतांकडे संक्रमण.
  2. काही जैविक, रासायनिक आणि भौतिक प्रक्रियांद्वारे वातावरणातून नैसर्गिकरित्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होत असते. या कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचे संतुलन घडवून आणणाऱ्या या नैसर्गिक प्रक्रियांव्यतिरिक्त इतर कृत्रिम प्रक्रिया अवलंबिणे उदा. कार्बन संग्रहण व साठवणूक(कार्बन डायऑक्साईड वातावरणातून काढण्याची किंवा वेगळा करून साठवून ठेवण्याची प्रक्रिया)[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Carbon neutrality". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-03-04.
  2. ^ "Carbon sequestration". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-02-22.