कारवी
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
कारवी ही एक रान वनस्पती आहे.
माहिती
[संपादन]कारवीचे शास्त्रीय नाव स्ट्रॉब्युलेंथस कैलोसस असे आहे.हे नाव ब्रिटिश इंजिनिअर नीज यांनी दिले. ते मुंबईच्या नौदलात काम करीत होते. कारवीच्या मराठी नावावरून कारवीला पर्यायी शास्त्रीय नाव कार्वीया क्एलोसा सुद्धा आहे. ते भारतीय वनस्पती सर्वेक्षण चे संचालक फादर सांतापाऊ ह्यांनी तयार केले. ते फ्लोरा ऑफ पुरंदर पुस्तकाचे लेखक आहेत.
गुणधर्म
[संपादन]डोंगराच्या खड्या उतारावर कारवी रुजते आणि वाढते. तिथे अन्य वनस्पती वाढत नाहीत. कारवीमुळे जमिनीची धूप रोखली जाते. कारवी दर सात वर्षांनी फुले धारण करते. कारवीच्या फुलातील मध खाण्यासाठी फुलपाखरे व मधमाश्या भरपूर येतात त्यामुळे कारवीच्या फुलांच्या मोसमात भरपूर फुलपाखरे आणि मधमाश्या असतात. कारवीच्या मधात औषधी गुणधर्म असतात असे स्थानिक लोक सांगतात. कारवीच्या फुलांना बिया येतात. बिया तडकून मूळ झाडापासून दूरवर पडतात.अश्या बियांपासून पुढील पिढी तयार होते. कारवी वनस्पतीला फळे आली की ते झाड त्यावर्षी मरते. कारवीच्या फुलांचा रंग जांभळा निळा असतो आणि तो हिरव्या जंगलात फारच मनमोहक दिसतो. सह्याद्रीच्या डोंगरावर होणारी कारवी सात वर्षांनी फुलते तर कुरुंजी नावाने ओळखली जाणारी दक्षिण भारतातील कारवी बारा वर्षांनी फुलते.
कारवी संरक्षण
[संपादन]डॉ.मंदार दातार हे वनस्पती संशोधक आहेत. ते आघारकर संशोधन संस्थेत कार्यरत आहेत.त्यांच्या म्हणण्यानुसार घराच्या भिंतीना आधार म्हणून किंवा इतर वेलजातीच्या पिकांना आधार म्हणून कारवीची भरपूर तोड केली जाते म्हणून त्यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. कारवी वनस्पतींचे संरक्षण आणि संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे असे ते म्हणतात. [१]
- ^ महाराष्ट्र टाईम्स, बुधवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२४